दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, बजाजनगर येथे श्री स्वामी पुण्यतिथी निमित्त अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताह अयोजन
मुल्यसंस्कार विभागातील गर्भसंस्कार, शिशुसंस्कार विषयावरील प्रदर्शन, प्रात्यक्षिक व मार्गदर्शन ठरत आहेत आकर्षण

छ संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.3
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ, त्र्यंबकेश्वर येथील पिठाधिष परमपूज्य गुरूमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे यांच्या आशिर्वादाने बजाजनगर येथील दिंडोरी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री स्वामी पुण्यतिथी निमित्ताने अखंड-नाम-जप-यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे.
दिनांक ३० एप्रिल पासून या सप्ताहाला सुरवात झाली असून दिनांक ०६ मे २०२४ रोजी महानैव्यद्य आरतीने या सप्ताहाची सांगता होणार आहे. या सप्ताहात एकुण ६३२ महिला व पुरुष सेवेकरी श्री गुरूचरीञ पारायणासाठी बसले आहेत. यामध्ये महिला सेवेकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. सप्ताह काळात विविध प्रकारच्या अध्यात्मिक सेवेचे नियोजन करण्यात आले आहे.
दिनांक ३० एप्रिल रोजी मंडलस्थापना, स्थापित देवता अवाहन व अग्निस्थापना करून उत्सवाला सुरवात झाली. दैनंदिनी मध्ये सकाळी ६.०० वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांचा महाभिषेक, ६.०० ते ८.०० वाजेपर्यंत सामुदायिक श्री गुरूचरीञ पारायण, सोबतच यज्ञ मंडपात ६.४५ वाजता नित्यस्वाहाकार, ७.३० वाजता औदुंबर प्रदक्षिणा, ८.०० वाजता भूपाळी आरती, ०८.१५ ते १०.३० वाजेपर्यंत विषेश याग, १०.३० वाजता नैवेद्य आरती, दुपारी २.०० ते ५.०० या वेळेत श्री स्वामी चरित्र सारामृत, श्री दुर्गा सप्तशती पाठ व श्री रूद्रावर्तने, सायंकाळी ६.०० वाजता औदुंबर प्रदक्षिणा, सायंकाळी ६.३० वाजता नैवेद्य आरती, ७.०० वाजता विविध विषयांवर मार्गदर्शन, ७.३० वाजता श्री विष्णू सहस्त्रनाम होणार आहे. रोज सकाळी ८.०० ते रात्री ८.०० या वेळेत महिला सेवेकरी व रात्री ८.०० ते सकाळी ८.०० या वेळेत पुरूष सेवेकरी प्रहरेची सेवा रूजू करणार आहे.
विषेश यागामध्ये दिनांक ०१ मे रोजी श्री गणेश याग व श्री मनोबोध याग, ०२ मे रोजी स्वामी याग, ०३ मे रोजी चंडी याग संपन्न झाला. तसेच ०४ मे रोजी गिताई याग, ०५ मे रोजी श्री रूद्र याग होणार आहे.
दिनांक ०६ मे २०२४, सोमवार रोजी श्री सत्य दत्त पुजन व बली पूर्णाहूती होऊन सकाळी १०.३० वाजता महानैवेद्य आरतीने सप्ताहाची सांगता होणार आहे.
दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या २०% अध्यात्म आणि ८०% समाजकार्य या उक्तीला प्रेरीत होऊन दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबीराचे अयोजन करण्यात आले होते. यामध्ये शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभाग घेतला.
धकाधकीच्या जीवनात अध्यात्मिक स्थैर्य व मनःशांती मिळवण्यासाठी सप्ताहकाळ ही अभूतपूर्व पर्वणी ठरणार आहे. बजाजनगर केंद्रातील व्यवस्थापन व नियोजन प्रतिनीधींच्या वतीने पंचक्रोशीतील सर्व भाविक सज्जन, भक्तगण व सेवेकरी यांना या अतिदुर्लभ अध्यात्मिक सेवेत सहभागी होऊन स्थापित देवतांचे कृपाशिर्वाद प्राप्त करून घेण्याचे अवाहन करण्यात आले आहे.