कै. विनूबाई बळी पाटील प्राथमिक माध्यमिक विद्यालय मध्ये किडा सप्ताचे आयोजन

आनिल वाढोणकर/छ.संभाजीनगर,दि.31
कै.वेणूबाई बळी पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय विटावा व रवीसूत मराठी प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आसून या क्रीडा सप्ताह निमित्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरक्षनाथ जी बळी पाटील साहेब यांचे चिरंजीव अनिकेत भैया पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करून त्यांनी विद्यार्थ्यांना काही खेळाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी रवीसूत मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जोशी मॅडम विलास जाधव सर संतोष गायकवाड सर सचिन काथार सर संतोष गायकवाड सर काकासाहेब तांदळे सर बहादुरे मॅडम गायकवाड मॅडम हे उपस्थित होते
खालील खेळाचे नियोजन करण्यात आले या क्रीडा सप्ताहात खालील क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सांघिक खेळ (१) कबड्डी (२) हॉलीबॉल (३) खो-खो(४) क्रिकेट (५) बॅडमिंटन (६) चेस (७) टेबल टेनिस (८) रस्सीखेच.(९) संगीत खुर्ची (१०) योगासने(११) लिंबू चमचा (१२) तीन पायी शर्यत(१३) (१४) धावणेस्पर्धा..
वैयक्तिक खेळ(१) गोळा फेक (२) थाळीफेक (३) भालाफेक (४) अर्चरी, इत्यादी क्रीडा स्पर्धा घेण्यात येतील. व विजयी खेळाडूंना प्रोत्साहनपर सन्मानपत्र मेडल ट्रॉफी देऊन गौरविण्यात येईल.