श्रावण मास निमित्त वीरशैव युवकांची गेवराई ते कपिलधार पदयात्रा

गेवराई/प्रतिनिधी,दि.10
येथील शिवहर प्रतिष्ठानच्या वतीने श्रावण मास निमित्त पदयात्रा दि.09 व 10/09/2023 या दिवशी संपन्न झाली.सकाळी सहा वाजता रुद्रेश्वर मंदिर गेवराई येथुन पदयात्रेस प्रारंभ झाला. रात्री बीड येथे मुक्काम बीड येथील व्यापारी श्री प्रभुलिंग अप्पा शेटे यांच्या वतीने पदयात्रा चे स्वागत झाले व गेल्या पंचवीस वर्षांपासून ते पदयात्रा ची महाप्रसाद व निवासाची सोय ते करतात. यात्रेचे हे २५ वे वर्ष असून शिवैक्य यशवंत रुकर यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेतून ही पदयात्रा अखंड चालू आहे परंतु यावर्षी यशवंतराव रुकर यांच्या विना ही यात्रा अधुरी असल्याची सर्वांना जाणीव झाली. दिनांक १०/०९/२०२३ रविवार पहाटे पाच वाजता बीड येथे निघून सकाळी अकरा वाजता गुरुराज माऊलींचा गजर करत श्रीक्षेत्र कपिलधार च्या पावन भूमीत पोहोचली सर्व युवकांच्या वतीने श्री संतशिरोमणी मन्मथस्वामी यांच्या समाधीची महापूजा व महाआरती करण्यात आली गेवराई येथील कपड्याचे प्रतिष्ठित व्यापारी श्री अनिल आप्पा शेटे यांच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली या पदयात्रेस पंचवीस युवकांचा सहभाग होता.