संदीप तुपकरी सामाजिक कार्यकर्ते यांचा हदगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने सन्मान

हदगांव/ प्रभाकर डुरके,दि.22
आजघडीला वधू-वर संशोधनासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत, परंतु त्यासाठी पालकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. परंतु हदगाव येथील संदीप आनंदराव तुपकरी यांनी वधू-वर संशोधनासाठी अनोखी शक्कल लढविली असून व्हॉट्सअॅपवर वधू-वरांची संपूर्ण माहिती अपलोड करुन दिली आहे. या निःशुल्क सेवेमुळे शेकडोचे लग्न जुळले .
समस्त वीरशैव लिंगायत समाजातील वाणी, तेली, कोष्टी, जंगम समाजबांधवांना वधू-वर संशोधनात मदत व्हावी यासाठी हदगावच्या संदीप तुपकरी यांनी वधू-वरांची संपूर्ण माहिती व्हॉट्सअॅपवर त्यांच्या छायाचित्रासह टाकण्यास सुरुवात केली. दिवसेंदिवस त्यांच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे
* या सेवेच्या माध्यमातून सोलापूर, सांगली, सातारा, लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड, औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई आदी ठिकाणचे समाजबांधवही या उपक्रमाशी जोडले आहेत.
व्हॉट्सअॅपवर वधू-वर परिचय १ ते ६६ भाग तयार करण्यात आले. अनेक वर्षांपासून तुपकरी हे व्हॉट्सअॅपवर वधू-वरांची माहिती अपलोड करुन निःशुल्क सेवा देत आहेत. त्यामुळे हजारो समाजबांधव आपल्या पाल्यांची माहिती या ग्रुपवर टाकत असल्यामुळे वर-वधू संशोधनाचे काम सोपे झाले आहे. ९८८११८८५५४ या क्रमांकावरील व्हॉट्सअॅपवर वीरशैव समाजातील वधू-वरांच्या माहितीची देवाणघेवाण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षी हदगाव येथे मेळाव्यात वधू-वरांनी नोंदणी केली जाते. पत्रकारितेतही मागील अनेक वर्षापासून ते अतिशय चांगले काम करत असल्यामुळे त्यांना अनेक वेळा पुरस्कार देण्यात आले असाच एक पुरस्कार कंधार येथील पत्रकार सोहळ्यामध्ये देऊन त्यांना गौरविण्यात आले त्यामुळे हादगाव तालुक्यातील पत्रकारांनी सुद्धा त्यांचा दिनांक 20 मे 2023 रोजी सर्वानुमते सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले