pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

26 ऑगस्ट रोजी काढणी पश्चात पायाभूत सुविधा व गोदाम घटकासाठी प्राप्त अर्जाची सोडत

0 4 1 3 3 6
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.19

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान – तेलबिया सन 2025-26अंतर्गत जालना जिल्ह्यासाठी फ्लेक्सी घटकांतर्गत गोदाम बांधणीसाठी भौतिक 1 त्यासाठी 50 टक्के किंवा 12.50 लाख अनुदान तसेच काढणी पश्चात पायाभूत सुविधा या घटकासाठी भौतिक 1 त्यासाठी खर्चाच्या 33 टक्के किंवा 9.90 लाख याप्रमाणे लक्षांक प्राप्त आहे. या घटकासाठी इच्छुक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात ‍विहीत वेळेत दि. 31 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे कृषि विभागाने कळविले होते. त्यावनुषंगाने काढणी पश्चात पायाभुत सुविधा व गोदाम या घटकासाठी जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनींचे अर्ज संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयास दाखल केले आहेत. या बाबीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या दालनात मंगळवार दि. 26 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता मार्गदर्शक सुचनेच्या अधिन राहून संबंधित अधिकारी व कर्मचारी तसेच शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी यांच्या समक्ष सोडत पध्दतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे, तरी अधिकारी व कर्मचारी तसेच शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींनी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जी.आर.कापसे यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 3 3 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे