pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

संत निरंकारी अध्यात्मिक मिशन नविन शेवा,उरण या नवीन केंद्राचे व हॉलचे उद्घाटन सोहळा संपन्न.

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती.

0 1 7 4 0 8

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3

सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या असीम कृपाशीर्वादाने उरण सिटी बॅच मध्ये नवीन सत्संग व हॉलचा उद्घाटन रविवार दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी नवीन शेवा येथे संपन्न झाले, यावेळी सत्संगाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते, सदर कार्यक्रमास परम.आ.अनिल चव्हाण ज्ञानपरस प्रचारक,ऐरोली सत्संग प्रमुख अशोक केरेकर व समीर पाटील यांची विशेष उपस्थिती होती तर उरण चे माजी आमदार चे मनोहरशेठ भोईर यांची प्रमुख उपस्थिती होती, यावेळी निरंकारी मिशन चे सेक्टर संयोजक दता पाटील यांच्या हस्ते माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच प्रत्येक रविवारी सत्संग संध्याकाळी ६ ते ८ ह्या वेळेस असणार आहे, तरी सर्वांनी सत्संग चा लाभ घ्यावा, आशी सत्संग केंद्रप्रमुखांकडून विनंती करण्यात आली आहे.सदर कार्यक्रम प्रसंगी नवीन शेवा सरपंच सोनल घरत, गावचे अध्यक्ष कमलाकर पाटील, संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, कामगार नेते गणेश घरत, ग्रामपंचायत सदस्य वैशाली म्हात्रे, शाखा संघटिका वैशाली सुतार, सुरेखा भोईर, शुभांगी भोईर, प्रमुख कार्यकर्ते शेखर पडते, परशुराम ठाकूर, परशुराम म्हात्रे, सत्संग भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे