pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पुर्वजाचा इतिहास जतन करण्यासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज- डॉ यशपाल भिंगे

पळसा येथे श्री बिरोबा महाराज मंदिर परीसराचे लोकसहभागातून झालेल्या कायापालटाचे केले कौतुक

0 1 7 3 8 8

हदगाव/ प्रभाकर डुरके,दि.12

पळसा ता.हदगांव येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराज यांचे मंदिर निसर्ग रम्य परिसरात माळावर आहे.येथील मंदिराचा कायापालट करण्यासाठी नवीन आबादी येथील बिरोबा मित्र मंडळाच्या युवकांनी पुढाकार घेत श्रमदान करून प्रत्येक रविवारी सकाळी सात वाजता आरती महाप्रसाद सुरू केला असल्याने गावकऱ्यांसह पुसद येथील चिलगर कुटुंबासह माजी पंचायत समिती सदस्य डॉ बि.के.निळे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिंगाबर साखरे यांनी योगदान दिले होते तर दिवसेंदिवस भाविक भक्त पुढाकारात सहभाग घेत असल्याने दिवसेंदिवस मंदिर परिसरात कायापालट होत आहे.भक्तासाठी माळावर पायी रस्ता असल्याने माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी कच्च्या रस्ता करून दिला.तर आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी पक्का रस्ता कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
दर रविवारी होणाऱ्या आरती महाप्रसादाला राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होत आहेत.रवीवारी बहुजन समाजाचे युवा नेते प्राध्यापक डॉ यशपाल भिंगे यांनी आरती व महाप्रसादाला उपस्थित राहुन नवीन आबादी येथील बिरोबा महाराज मित्र मंडळाच्या युवकांनी हाती घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करीत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करीत उपस्थितांना सध्याच्या परिस्थितीवर मार्गदर्शन करीत सर्वांनी महापुरुषांचे विचार आणावे असे सांगत पुर्वजाचा इतिहास वस्तू जतन करण्यासाठी युवकांनी पुढे यावे असे आवाहन केले.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक कार्यकर्ते भक्त मंडळी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे