pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शेवा कोळीवाडा ग्रामस्थांना आता न्यायासाठी ३ महिन्यांची प्रतीक्षा

"शेवा गावातील कोळी समाजाचा जेएनपीटी विरोधात ऐतिहासिक चॅनेल बंद आंदोलन यशस्वी "समुद्रात उतरून संघर्षाची नवी लढाई

0 3 1 5 0 2

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.24

उरण तालुक्यातील शेवा गावातील कोळी समाजाने ४० वर्षांपासून जेएनपीटी (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) मार्फत होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात चॅनेल बंद आंदोलन पुकारले होते. गावकऱ्यांनी पाण्यात उतरून आपला रोष व्यक्त केला, कारण समुद्रात उतरून असा लढा उभारण्यात आला होता.या आंदोलनात महिलांचे मोठे योगदान ठरले असून, त्यांनी आपल्या हक्कांसाठी पुढाकार घेतला व संघर्षात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.ज्यामुळे आंदोलन ऐतिहासिक ठरले.

जेएनपीटीने प्रकल्प विस्ताराच्या नावाखाली शेवा गाव विस्थापित केले आणि गावकऱ्यांना संक्रमण शिबिरांमध्ये हलवले. चार दशके अत्यंत असुरक्षित आणि अमानवी परिस्थितीत कोळी समाज जगत आहे. हा अन्याय थांबवण्यासाठी आणि हक्क पुनर्स्थापित करण्यासाठी गावकरी संविधानिक मार्गाने लढा देत आहेत.

दिवसाच्या उत्तरार्धात, भारत सरकारच्या जलवाहतूक, पोर्ट आणि शिपिंग विभागाचे कॅबिनेट मंत्री श्री. सर्बानंद सोनोवाल यांनी वेस्टिन, पवई येथे आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाशी भेट घेतली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व श्री.रमेश कोळी, श्री.नंदकुमार पवार, अ‍ॅड. सिद्धार्थ इंगळे, आगरी समाज नेते श्री.जयेंद्र खुणे आणि मार्शल कोळी यांनी केले. या बैठकीस रायगडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री.सुनील थोरवे, उपजिल्हाधिकारी श्री.भरत वाघमारे, एसडीओ पनवेल श्री.पवन चंदक, तसेच जेएनपीटीचे अध्यक्ष श्री. उन्मेष वाघही उपस्थित होते.

मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या ४० वर्षांच्या संघर्षकथा ऐकून स्तब्ध झाले आणि आंदोलकांप्रती सहानुभूती व्यक्त केली. त्यानंतर, मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पुनर्वसन प्रक्रिया ३ महिन्यांत पूर्ण करण्याचे शब्द दिले. या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले.

सदरील चॅनेल बंद आंदोलनात नवी मुंबई पोलीस प्रशासनाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सहपोलीस आयुक्त संजय येनपुरे , उपायुक्त प्रशांत मोहिते , सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल नेहूल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी आंदोलन शांततापूर्ण आणि सुव्यवस्थित राहण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे आंदोलन सुरळीत पार पडले आणि गावकऱ्यांच्या मागण्यांना सकारात्मक वळण मिळाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 5 0 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे