कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिम अंतर्गत राज्यस्तरावर जालना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र प्रथम क्रमांकावर

जालना/प्रतिनिधी,दि.23
महाराष्ट्र शासनाने क्षेत्रीय कार्यालयातील सुधारणा कार्यक्रमाच्या 100 दिवसीय कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व विभागातील जिल्हास्तरीय क्षेत्रीय कार्यालयाच्या कामकाजाचे मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (क्युसीआय) यांचेकडून करण्यात आले होते. या मूल्यमापनामध्ये जालना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे, ही बाब जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.
100 दिवसीय कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमे अंतर्गत जालना जिल्हा कार्यालयामार्फत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. शासन निर्णयानुसार, क्षेत्रीय कार्यालयांना 100 दिवसांचा 10 कलमी महत्वकांशी कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. या कृती कार्यक्रमांतर्गत पुढील मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले संकेतस्थळाचा विकास व अद्ययावत माहिती उपलब्ध करणे, नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी उपाययोजना, स्वच्छता व कार्यालयीन परिसराचे व्यवस्थापन, जनतेच्या तक्रारींचे वेळेवर व प्रभावी निराकरण, कार्यालयातील सुविधा व सोयींचा स्तर उंचावणे, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रसार व प्रोत्साहन, क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी व आढावा, ई-ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी या सर्व घटकांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळेच या कार्यालयाने राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या उल्लेखनीय यशासाठी कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनिषा वर्मा, नितीन पाटील, आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मुंबई, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उप आयुक्त, आयुक्तालय मुंबई, डी.डी.पवार, उप आयुक्त विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर विद्या शितोळे, यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालनाचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांच्या मार्गदर्शनाखाली भुजंग रिठे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, सुरेश बहुरे, आत्माराम दळवी, डॉ. अमोल परिहार, अमोल बोरकर, प्रदिप डोळे, रविंद्र पाडमुख, विशाल जगरवाल, सुभाष पंडीत, उमेश कोल्हे, दिनेश उढाण, सोमेश्वर शिंदे, निर्मल बिडकर, दिपक पालवे, अमर तुपे यांचे सहकार्य लाभले आहे.