pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

नवघर ग्रामपंचायततर्फे नागरिकांना कचरा कुंडीचे वाटप तसेच आरओ प्लॅन्टचे उदघाटन.

0 1 7 4 1 5

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.30

ग्रामपंचायत नवघर तर्फे कुंडेगाव येथे घरोघरी प्रत्येक कुटुंबाला कचरा कुंडीचे वाटप करण्यात आले.तसेच शुध्द पाणी पुरवठा करणेसाठी नवघर येथे आरओ प्लॅन्ट बसविणेत आले.सरपंच कविता मढवी, उपसरपंच विश्वास तांडेल,माजी उपसरपंच दिनेश बंडा,सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, ग्रामविकास अधिकारी जे. के. म्हात्रे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे, परिसर स्वच्छ राहावा, रोगराई पसरू नये या अनुषंगाने स्वच्छते विषयी जनजागृती करत नागरिकांना कचरा जमा करण्यासाठी घरोघरी कचरा कुंडीचे वाटप करण्यात आले. तसेच विविध रोगराई व नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता शुद्ध पिण्याच्या पाण्याचे प्लॅन्ट सुद्धा बसविण्यात आले. चांगल्या अशा कार्यक्रमाचे, चांगल्या योजनेचे उदघाटन झाल्याने सदर कार्याचे ग्रामस्थांनी मनापासून स्वागत केले. सर्व ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांचे आभार मानले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे