pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सारडे ग्रामविकास समितीच्या वतीने मंत्रालय महाराष्ट्रसारडे ग्रामविकास समितीच्या वतीने मंत्रालय महाराष्ट्र राज्य,मुंबई येथे सारडे गावठाणविस्तारचे प्राथमिक प्रस्ताव सादर.

0 1 7 2 3 5

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18

शासनाच्या एमआयडीसी मार्फत सारडे,वशेणी,पुनाडे येथील जमिनी संपादन करण्याचा घाट चालू असताना यामध्ये जमिनी व शेत जमीनीवरील घरे बाधित होणार आहेत ही धोक्याची घंटा ओळखून सारडे ग्रामस्थांनी सारडे ग्रामविकास समितीची एकमताने स्थापना केली.समितीच्या माध्यमातून लोकसहभाग व लोकवर्गणीतून गावठाणविस्तार साठी पहिले पाऊल म्हणून प्राथमिक प्रस्ताव पंतप्रधान कार्यालय ते मंत्रालयातील मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्री ,महसूल विभाग,नगरविकास,पुनर्वसन अश्या सर्व विभाग,त्या विभागांचे मंत्री, सचिव,अश्या 32 ठिकाणी प्रत्यक्षरीत्या गावठाणविस्तार बाबत प्रस्ताव देण्यात आले.यामध्ये जिल्हाधिकारि, प्रांत,तहसिलदार, बीडीओ पर्यंतच्या विभागांचा समावेश आहे.जिल्हाधिकारी व जिल्हा भुअभिलेख यांना वरिष्ठ स्तरावरून सीमांकणाचे व सर्व्हेक्षणाचे आदेश न झाल्यास सारडे ग्रामविकास समिती लवकरच सारडे गावचे सीमांकन लोकवर्गणीतून व लोकसहभागातून स्वत: करेल अशी माहिती सारडे ग्रामविकास समितीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 2 3 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे