जालना: तालुक्यातील दुधना काळेगाव येथील पोकळवडगाव व पुणेगाव शिवाराला जोडणाऱ्या शेतरस्त्याच्या दुरुस्तीचे काम समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी गुरुवारी (दि.१३) स्वखर्चातून सुरु केले. यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर झाली.
दुधना काळेगाव येथील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पोकळवडगाव व पुणेगाव शिवारालगत आहे. या शिवाराकडे जाणारा रस्ता अनेक वर्षापासून नादुरुस्त असल्याने शेतकरी कुटुंबाची पावसळ्यात मोठे हाल व्हायचे. हा रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी गावातील युवा शेतकऱ्यांनी सतीश घाटगे यांच्याकडे बुधवारी केली होती. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन सतीश घाटगे यांनी दुसऱ्याच दिवशी यंत्रणा व जेसीबी मशीन पाठवून रस्त्याचे काम सुरु केले. एवड्या तातडीने काम सुरु झाल्याने शेतकरी देखील अचंबित झाले. समृध्दी कारखान्याचे संचालक रणजित उढाण, भाजपचे ज्येष्ठ नेते रामेश्वर भांदरगे यांच्या हस्ते या रस्त्याचे काम सुरु झाले. यावेळी निळकंठ भांदरगे, संजय आटोळे, गणेश काळे, सुधाकर मस्के, योगेश काटे, जगण आण्णा मस्के, विलास भिंगारदेव, सतिश भांदरगे, दिनेश काळे, डिगांबर मस्के, सारंग शेळके, कृष्णा मस्के, बळीराम भांदरगे, लक्ष्मण मस्के, गोरख रोकडे, बळीराम मस्के सह शेतकरी उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा