ब्रेकिंग
विकसित भारत संकल्प यात्रा ; 16 डिसेंबर रोजी दूरदृश्यप्रणालीव्दारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साधणार लाभार्थ्यांशी संवाद
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे चिखली येथील कार्यक्रमास राहणार उपस्थित
0
1
7
4
0
9
जालना/प्रतिनिधी,दि.15
विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने शनिवार, दि. 16 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 4.00 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृश्यप्रणालीव्दारे लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे बदनापूर तालुक्यातील चिखली येथे दुपारी 2.30 वाजता आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी विविध विभागांच्या लोककल्याणकारी योजनांच्या अनुषंगाने नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध राहणार आहे. या कार्यक्रमास लाभार्थी, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
0
1
7
4
0
9