पोलीस प्रशिक्षण केंद्रातील निरूपयोगी साहित्य खरेदी करण्याचे आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि.15
येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र कार्यालयातील जुने, निरूपयोगी, वापरण्यास अयोग्य स्थितीतील जुन्या साहित्याचे निर्लेखन करून विक्री करण्यात येणार आहे. सदर साहित्य खुल्या पध्दतीने निविदा व दरपत्रके मागवुन अधिकृत खरेदीदार फर्म यांना विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी दि. 16 ते 20 मे, 2025 या कालावधीत सदर साहित्य पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक अधिकृत खरेदीदार फर्मधारकांनी वरील कालावधीत साहित्याची पाहणी करून, बंद लिफाफ्याद्वारे निविदा व दरपत्रके या कार्यालयाकडे सादर करावे. सदर साहित्याची सविस्तर यादी व इतर अत्यावश्यक सूचना, अटी व शर्ती तसेच अर्जाचा विहित नमुना या कार्यालयाचे संकेतस्थळ WWW.PTCJALNA.COM वर प्रसिध्द करण्यात येईल.
साहित्याच्या प्रकारानुसार जास्तीत-जास्त दर असणाऱ्या खरेदीदार फर्मचाच विचार करण्यात येईल. सदर साहित्य विक्री करण्याच्या प्रक्रियेचे सर्व अधिकार तसेच सदरील विक्री प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्याचे सर्व अधिकार या कार्यालयाकडे राखुन ठेवण्यात आलेले आहेत.या कार्यालयातील अर्जाचे नोंदणी शुल्क रू.500/- (पाचशे ) व परतावा अनामत रक्कम (EMD) रू. 10.000/- (दहा हजार) हि धनाकर्ष (Demand Draft) व्दारे आगाऊ जमा करावी.असे आवाहन प्राचार्य,पोलीस प्रशिक्षण केंद्र,जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.



