भानुदास माळी यांनी केले महेंद्र घरत यांचे अभिष्टचिंतन.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.2
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे यशस्वी प्रदेश अध्यक्ष भानुदासजी माळी यांनी कोकण विभागीय अध्यक्ष शंभो म्हात्रे यांच्या विनंती नुसार काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रजी घरत यांच्या वाढदिवसानिमित्त उलवे नोड येथे भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. तसेच भानुदासजी माळी यांच्या हस्ते उलवे नोड येथील प्रवेशद्वार आणि चौकात काँग्रेसचा झेंडा रोवून पक्ष पदाधिकारी,कार्यकर्ते यांना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ऊर्जा दिली.यावेळी प्रदेश सरचिटणीस नंदकुमारजी कुंभार,ओबीसी रायगड जिल्हाध्यक्ष उमेशजी भोईर,बाळारामजी वासकर रायगड ओबीसी उपाध्यक्ष शैलेश पाटणे,श्रुती ताई म्हात्रे ,आर आर सिंह, रणजित कोळी तसेच उलवे नोडचे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.