शिक्षकांना हक्काचे दस्तऐवज मिळवण्यासाठी शिक्षण उपसंचालक यांना निवेदन (भाजपा शिक्षक आघाडीची मागणी )—संजय भातलवंडे

छ संभाजीनगर/प्रतिनिधी, दि.29
महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 नियम 9,11, व 12 तसेच शिक्षण सेवक शासन निर्णय 13 ऑक्टोबर 2000 अन्वये सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना त्यांना सेवेची संबंधित दस्तऐवज मिळण्याचा अधिकार असून सुद्धा त्यांना ते दस्तऐवज मिळत नाहीत.भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश संयोजक डॉ .प्रशम कोल्हे सर नागपूर विभागीय अध्यक्ष अनिल शिवणकर यांनी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांना सदर बाब निदर्शनास आणून दिली यावर शिक्षण संचालक यांनी तडकाफडकी राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक व सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनाच्या अनुषंगाने शिक्षक व शिक्षकतेत्तर कर्मचारी यांना हक्काचे दस्तऐवज मिळवून देण्याचे आदेश दिले तथापी छत्रपती संभाजी नगर विभागामध्ये शिक्षण उपसंचालकांनी असे आदेश दिले नसल्यामुळे भाजपा शिक्षक आघाडीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष संजय भातलवंडे यांनी शिक्षण उपसंचालक यांना शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सेवेशी हक्काचे दस्तऐवज मिळवून देण्याबाबत निवेदन देण्यात आले याप्रसंगी भाजपा शिक्षक आघाडीचे विभागीय अध्यक्ष संजय भातलवंडे छत्रपती संभाजी नगर उत्तर जिल्हा संयोजक रघुनाथ लघाने डॉ .सांभाळकर डॉ.दिलीप अर्जुने डॉ.शाकेर राजा, डॉ.आनंद चौधरी रवींद्र गीते,ज्योती तुपे,कविता झिरपे आदी पदाधिकारी उपस्थित होते