pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

श्रीं”च्या पालखी आगमनाने भक्तीमय वातावरण ; नागरिकांनी केले जल्लोषात स्वागत

जय गजानन श्री गजानन नामघोषाने दुमदुमूला परिसर

0 1 1 8 2 2

वडीगोद्री/तनवीर बागवान, दि.12

आषाढी एकादशी निमित्ताने आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेवून शेगांवकडे परतीचा प्रवास करणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे मंगळवारी जालना जिल्हायात आगमन झाले. ठिकठिकाणी रांगोळी तसेच फुलांचा वर्षाव करत दिंडीचे मोठ्या भक्तीमय वातावरणात जल्लोषात स्वागत करुन जय गजानन श्री गजानन या नामघोषाने दुमदुमून गेले होते.
गजानन महाराज यांची दिंडी व पालखी,अंबड तालुक्यात दोन दिवस मुक्कामी असते दिंडी असते शहापूर आणि लालवाडी गजानन महाराज दिंडी सोबत संत मुक्ताबाई पालखीचे यांचे सोबतच सुध्दा तालुक्यात आगमन झाल्याने दोन्ही पालखीचे आगमन होताच भक्तिमय वातावरण निर्माण झाले,
यावेळी दिंडीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांनी शिस्तीचे दर्शन घडविले.
विदर्भाची पंढरी असलेल्या शेगांवच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे गण गण गणात बोते व टाळ मृदंगाचा गजर करत मंगळवार दि.१२ जुलै रोजी अंबड तालुक्यात आगमन होऊन शहापूर येथे आजचा मुक्काम असुन गावकऱ्यांनी दिंडीच्या स्वागतासाठी रांगोळी काढुन, फुलांची उधळण करत फटाके वाजवुन जल्लोषात स्वागत केले. श्रीं’च्या पंढरपूर पालखी पायी वारीचे यंदा ५४ वे वर्ष आहे. श्री संत गजानन महाराज संस्थानने अखंडितपणे पायी वारीची परंपरा कायम ठेवली. शेगाव येथील मंदिरातून दि.२६ मे रोजी प्रस्थान झालेली ही दिंडीचा प्रवास ७५० किमी चालत वाटेत लागणाऱ्या नऊ जिल्ह्यातून प्रवास करत आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये दाखल होते. वापसचा प्रवास सुद्धा पायीच असतो. श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा सोबत भगव्या पताका खांद्यावर घेतलेले श्वेतवस्त्रधारी ७०० वारकरी, वाहन, घोडे, बँड पथक आदी वाद्यसह शिस्तबद्ध रांगा अशी तीर्थक्षेत्र पंढरपुर ते शहापूर पायी चालत प्रवास करीत पालखी तालुक्यात आली, यावेळी पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
जिल्ह्यात प्रवेश करताच भक्तिमय वातावरणात हा परिसर हरिनामाच्या गजरात दुमदुमून गेला होता. ठिक ठिकाणी वारकऱ्यांचे स्वागत करुन भाविकांनी भक्तिभावाने दर्शन घेतले. दरम्यान यावेळी गोंदी पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 2