pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

युवक-युवतींना रोजगाराची सुवर्णसंधी जालना येथे 13 सप्टेबर रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

0 1 7 4 1 4

जालना/प्रतिनिधी,दि. 12

नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. याप्रमाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,व मॉडेल करिअर सेंटर जालना, प्रशासकीय इमारत दुसरा माळा, जालना येथे दिनांक १३,सप्टेबर 2023 बुधवार सकाळी 10.30 ते दु. 2 वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्ह-जागेवर निवड संधी आयोजित करण्यात आला आहे. तरी युवक-युवतींनी प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त भुजंग रिठे यांनी केले आहे.
यासाठी मेटारोल्स प्रा. लि लिमिटेड ,जालना यांची बी.ई.इंजीनीअर पदवीधर उत्तीर्ण करीता 05 पदे, तसेच आई.टी.आई फिटर/इलेक्ट्रीशियन 05 पदे तसेच अकाऊंटन्ट पदासाठी बी.कॉम पदवीधर उत्तीर्ण करीता 05 पदे, गिरी-टेक.सिटीम्स प्रा. लि. जालना पदवीधर बी.ई.इंजीनीअर पदवीधर उत्तीर्णकरीता 02 पदे,बी.ई.इंजीनीअर इलेक्ट्रोनिकसाठी 02 पदे,ग्राफिक डिजाइनर पदवीधर उत्तीर्णसाठी 02 पदे असे एकूण 21 रिक्तपदे प्राप्त झालेली आहेत. याकरीता नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणा-या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध होणार आहे.‍
जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या सुवर्ण संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेज वरील नोकरी साधक लॉगिन मधून आपल्या युजर आयडी व पासवर्ड च्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅसबोर्ड मधील पडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून जालना जिल्हा निवडून त्यातील स्पेशल जॉब फेयर जालना याची निवड करावी. उद्योजक/नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. याप्रमाणे आवश्यक किमान पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा आणि किमान तीन प्रतीत बायोडाटासह फोटो आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, इ.कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवून दिनांक 13 सप्टेबर 2023 बुधवार सकाळी 10.30 वाजता प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना, प्रशासकीय इमारत दुसरा माळा, जालना येथे उपस्थित रहावे, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे