ब्रेकिंग
राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत इम्तियाज मणियार यांचा भाजपात प्रवेश

pub-7425537887339079
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला आज शहागडमध्ये मोठा धक्का बसला. पक्षाचे कट्टर समर्थक आणि शहागडमधील जाणते कार्यकर्ते इम्तियाज बाबूमिया मणियार यांनी भारतीय जनता पक्षात (भाजपा) जाहीर प्रवेश केला आहे. मानियार यांनी भाजप नेते सतीश घाटगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला . तालुका भाजपा प्रमुख शिवाजी नाना मोरे आणि इम्रान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली मणियार यांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले.
या पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान, भाजप नेते सतीश घाटगे यांनी इम्तियाज मणियार यांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांचा सत्कारही केला. यावेळी डॉ. रमेश तारगे यांच्यासह भाजपाचे अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
इम्तियाज मणियार हे शहागडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे एक निष्ठावान आणि सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांचा भाजपातील प्रवेश हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससाठी झटका मानला जात आहे.
या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना सतीश घाटगे म्हणाले, “इम्तियाज मणियार यांच्यासारख्या कार्यकर्त्याचा भाजपात प्रवेश होणे हे पक्षासाठी निश्चितच सकारात्मक बाब आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि जनसंपर्काचा फायदा पक्षाला होईल.”
शिवाजी नाना मोरे यांनी सांगितले की, “इम्तियाज भाईंचे भाजपात स्वागत आहे. त्यांच्या येण्याने पक्षाची ताकद निश्चितच वाढेल आणि शहागडमध्ये भाजपा अधिक प्रभावीपणे काम करू शकेल.”
दरम्यान, इम्तियाज मणियार यांच्या प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, “सतीश घाटगे यांच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या विकासकामांच्या दृष्टिकोनातून प्रेरित होऊन मी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.”