जिल्हाधिकारी कार्यालयात “हृदय संवाद” कार्यक्रम संपन्न

जालना/प्रतिनिधी,दि.5
दैनंदिन जीवनातील व्यस्त व तणावपूर्ण जीवनशैली हा सद्यःस्थितीमध्ये प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग झाला आहे, ज्याचा नकळतपणे विपरीत परिणाम आरोग्यावर होत आहे. यामध्ये हृदयाशी संबंधित समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील सर्व अधिकारी –कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी जालना येथील कलावती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. कृष्णा कोरडे यांच्या पुढाकाराने हृदयासंबंधी जनजागृतीसाठी “हृदय संवाद” कार्यक्रम शुक्रवार दि. 5 जुलै 2024 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांच्यासह सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती होती.