भगतसिंग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पत्र संस्थेने सभासदांची दिवाळी केली गोड !

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.18
मान्यताप्राप्त खाजगी माध्यमिक अनुदान व अंशतः अनुदानित शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी सुरू असलेल्या भगतसिंग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था मर्यादित जालना या पतसंस्थेची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. पतसंस्थेचे अध्यक्ष आरेफ कुरेशी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळी पूर्वी होण्याची शक्यता कमी असल्यामुळे पतसंस्थेने दिवाळीच्या तोंडावर लाभांश रोखीने वाटप करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे संस्थेला सरलेल्या आर्थिक वर्षात २७ लाख एवढा नफा प्राप्त झाला आहे त्यामुळे ९ टक्के दराने सर्व सभासदांना १६ लाख ६२ हजार रुपये एवढा नफा त्यांच्या भाग भांडवलाच्या प्रमाणात रोखीने वाटप करण्यात आला आहे संस्थेची उलाढाल यावर्षी ३ कोटी १ लाख ,१ हजार ६२२ रुपये एवढी झाली आहे यावेळी सेवानिवृत्त सभासद तथा मुख्याध्यापक शिवाजी केदार नूतन विद्यालय जालना यांचा पतसंस्थेच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला त्याच पद्धतीने मराठवाडा शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष फरकुंद अली सय्यद यांचे चिरंजीव हसन अली सय्यद याची एमबीबीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल पिता पुत्रांचा यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बामुक्टो या संघटनेचेचे विभागीय सरचिटणीस तथा अर्थशास्त्र विषयाचे प्रसिद्ध अभ्यासक डॉ मारोती तेगंमपुरे हे होते यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष तथा तज्ञ संचालक प्रेमदास राठोड ,उपाध्यक्ष रमेश आंधळे, सचिव नारायण मुंडे , संचालक गणेश चव्हाण, अरुण आंधळे, हकीम पटेल, स्वीकृत संचालक संजय येळवंते, जगन वाघमोडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संचालक भीमाशंकर शिंदे तर आभार प्रदर्शन अरुण आंधळे यांनी केले.शेवटी स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली

