ब्रेकिंग
पत्रकारांसाठी इव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचे 12 फेब्रुवारीला प्रात्यक्षिक

0
3
0
5
6
3
जालना/प्रतिनिधी,दि.6
जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी सोमवार, दि. 12 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 3.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात इव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनच्या प्रात्यक्षिकाचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे आयोजन करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनची जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. दि. 12 फेब्रुवारी रोजी आयोजित प्रात्यक्षिकासाठी जालना शहरासह सर्व तालुक्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या पत्रकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी केले आहे.
0
3
0
5
6
3