pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0 1 7 4 1 2

जालना/प्रतिनिधी,दि. 2

महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करित असलेल्या समाज सेविका व संस्थाच्या कार्याची दाद घ्यावी तसेच समाज सेविका व संस्थाना पुढे प्रेरणा मिळावी, त्यांच्या समाजसेवेची प्रशंसा व्हावी जेणे करून महिला व बालकांच्या उन्नतीसाठी समाज सेविका व संस्थानी पुढाकार घ्यावा, यासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करित असलेल्या समाज सेविका व संस्थांना राज्य शासना कडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर देण्यात येतो. सन 2020-21, 2021-22, 2022-23 व 2023-24 या कालावधीतील पुरस्कारासाठी इच्छुक समाजसेविका, संस्थांनी आपले प्रस्ताव दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तीन प्रतित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
राज्य, जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी महिला समाजसेविका तर विभाग स्तरीय पुरस्कारासाठी स्वयंसेवी संस्था यांनी प्रस्ताव सादर करावेत. सदर राज्य स्तरीय पुरस्कारासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 25 वर्ष कार्य केलेले असावे. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात कमीत कमी 10 कार्य केलेले असावे. आणि विभागस्तरीय पुरस्कारासाठी स्वयंसेवी संस्था, पब्लीक ट्रस्ट अॅक्ट 1950 किंवा सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्ट नुसार पंजीबध्द असावी. तसेच संस्थेचे महिला व बाल विकास क्षेत्रातील सेवा व कार्य 7 वर्षाहुन जास्त असावे. यापुर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार / सावित्रीबाई फुले पुरस्कार अथवा दलितमित्र पुरस्कार मिळालेला नसेल अशा महिला समाज सेविका सदर पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल करू शकतात. अर्जदार महिलेचे कार्य जात, धर्म, पंथ आणि राजकीय पक्षाशी संबंधीत नसावे. पुरस्कार मिळण्याची पात्रता व्यक्तीगत मौलीक कार्यावरून ठरविण्यात येईल. समाजातील त्यांच्या पदाचा या बाबतीत विचार करण्यात येणार नाही. जालना जिल्हयातील पात्र समाजसेविका व स्वयंसेवी संस्था यांनी आपले सन 2020-21, 2021-22, 2022- 23 व 2023-24 या वर्षासाठीचे प्रस्ताव जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावरील पुरस्कारासाठी विहित नमुन्यात सादर करावेत.
प्रस्ताव स्विकृतीचे निकषात राज्यस्तरावरील पुरस्कारासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 25 वर्ष कार्य केलेले असावे. विभागस्तरावरील पुरस्कारासाठी स्वयंसेवी संस्थांनी महिला व बाल विकास क्षेत्रात 7 वर्षा पेक्षा अधिक कार्य केलेले असावे. जिल्हास्तरावरील पुरस्कारासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 10 वर्ष कार्य केलेले असावे. सन 2020-21, 2021-22, 2022-23 व 2023-24 पैकी कोणत्या वर्षासाठीचा प्रस्ताव आहे ते नमुद करावे. जिल्हास्तर / विभागस्तर / राज्यस्तर या पैकी जे असेल ते नमुद करावे. वैयक्तीक परिचय पत्र, विना दुराचार प्रमाण पत्र, गैरवर्तना संबंधी खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे पोलीस प्राधिकरणाचे प्रमाणपत्र, सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे