आजोबा चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरंगली फाटा येथे स्वखर्चाने बांधले श्री क्षेत्र काशी विश्वेश्वरा चे महाद्वार

भोकरदन/प्रतिनिधी,दि 12
भोकरदन तालुक्यातील सुरंगली फाटा येथे निलेश विजय पाटील आणि शैलेश विजय पाटील या पाटील बंधुनी आजोबा सेवानिवृत्त पोलिस पाटील सुरंगली राजेश्वर हनुमंत राव पाटील आणि वडील कै.विजय पाटील यांच्या स्मरणार्थ आणि आजोबा चे स्वप्न साकार करण्यासाठी सुरंगली येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री काशी विश्वेश्वराचे महाप्रवेशद्वार सुरंगली पासून 3 कि.मी.अंतरावर असलेल्या पिंपळगांव रेणुकाई रोडवरील सुरंगली फाटा येथे श्री क्षेत्र काशी विश्वेश्वराचे महाप्रवेशद्वारा चे बांधकाम स्वखर्चाने केले आहे.वडील राजेश्वर हनुमंत राव पाटील यांच्या स्मरणार्थ सुरंगली फाटा येथे श्री क्षेत्र काशी विश्वेश्वराचे महाप्रवेशद्वार बांधावे असे स्वप्न विजय राजेश्वर पाटील यांचेहोते.परंतु त्यांचे काही वर्षांपूर्वी अचानक निधन झाले.आजोबा चे आणि वडील विजय राजेश्वर पाटील यांचेही अपुर्ण राहीलेले स्वप्न साकार करण्यासाठी निलेश आणि शैलेश यांनी स्वखर्चाने सुरंगली फाटा येथे महाप्रवेशद्वार बांधुन पुर्ण केले असून उद्या दिनांक 13 एप्रील रोजी काशी विश्वेश्वर चरणी कायमस्वरूपी समर्पित सोहळा उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सुरंगली येथील ग्रामस्थांनी कार्यक्रमासाठी उपस्थित रहाण्याची विनंती आवाहन निलेश विजय पाटील आणि शैलेश विजय पाटील काशी विश्वेश्वर संस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ ,पदाधिकारी यांनी केले आहे.स्वखर्चाने बांधकाम केल्याबद्दल समस्त गावकरी आणि काशी विश्वेश्वर मंदिर समिती आणि धन्यवाद मानले आहेत.