pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

बरडशेवाळा आरोग्य केंद्रात कित्येक वर्षांनंतर शवविच्छेदनाला सुरवात

0 3 2 1 8 1

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.12

राष्ट्रीय महामार्गावर रोडलगत असलेल्या बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या टोलेजंग इमारतीला जवळपास पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत.बांधकाम करतानाच अधिकारी कर्मचारी वर्गाच्या निवासस्थानासह शवविच्छेदन रुमचे बांधकाम केले होते. गरजेनुसार अनुभवी वैद्यकीय अधिकारी देऊन सर्व सुविधा देणे गरजेचे असताना या ठिकाणी आरोग्य विभागाने कामचलाऊ नवीन शिकाऊ वैद्यकीय अधिकारी देऊन अनेक वर्ष काम भागवले.येथील शवविच्छेदन केवळ किरकोळ साहित्यासह अनुभवी वैद्यकीय अधिकारी नसल्याच्या कारणावरून शवविच्छेदन बंद असल्याने वेळ प्रसंगी ज्यांच्या वर आली त्यांच्या नातेवाईकांनी प्रेत शवविच्छेदनासाठी हदगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर हद्दीच्या विषयासह अनेक अडचणीच्या संघर्ष करावा लागत होता. कित्येक वर्षांनंतर दोन वर्षांपूर्वी नव्याने आलेल्या व निवासस्थानी राहुन कर्तव्य पार पाडत असलेल्या दोन्ही अनुभूवी वैद्यकीय अधिकारी डॉ एस बी भिसे व डॉ के.सी.बरगे यांनी आपल्या कर्मचारी वर्गाला सोबत घेऊन कार्यक्षेत्रात कौतुकास्पद काम करत वेळेनुसार जागेवर जाऊन शवविच्छेदन केले.प्राथमिक आरोग्य केंद्रातील शवविच्छेदन केंद्रात आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी संबंधित विभाकडुन निधी मंजूर असताना देखील आवश्यक त्या ठिकाणी काम करण्यासाठी ठेकेदाराकडे मुहूर्त मिळाला नसला तरी मागील आठवड्यात बरडशेवाळा येथील गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे शवविच्छेदन गावकऱ्यांच्या विनंतीवरून नाईलाजाने शक्य नसताना वैद्यकीय अधिकारी डॉ एस बी भिसे यांनी ठेकेदारांची मनमानीचा ताण स्वतःवर संघर्ष करीत कित्येक वर्षांनंतर पहिले शवविच्छेदन केले. कार्यक्षेत्रातुन वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कामावर समाधान तर ठेकेदारांच्या कामांवर रोष व्यक्त आहे. मुख्यालयी राहत कौतुकास्पद काम करण्या-या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानातील एक वर्षापासून स्वच्छता गृहासह विविध आवश्यक कामाचा दुरुस्ती निधी उपलब्ध असताना ठेकेदारांच्या मनमानीचा कर्मचारी वर्गासह कार्यक्षेत्रातील रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित ठेकेदारांनी विद्युत पुरवठा सह आवश्यक कामास प्राधान्य द्यावे अशी मागणी कार्यक्षेत्रातुन व्यक्त होत आहे.

कमी कर्मचारी असताना देखील कार्यक्षेत्रातील रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ देण्यासाठी आम्ही कोठेही कमी पडणार नाही.आम्ही दोघेही अनुभवी असल्याने कार्यक्षेत्रातील चार ते पाच शवविच्छेदन गरजेनुसार जाग्यावर जाऊन केले आहेत.आरोग्य केंद्रातील शवविच्छेदन रुममध्ये विद्युत पाणी ईतर कोणतीच सुविधा नसताना देखील गावकऱ्यांच्या आग्रहास्तव त्रास सहन करीत शवविच्छेदन केले. आम्हालाही सहकार्य अपेक्षित असते.
वैद्यकीय अधिकारी डॉ एस बी भिसे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे