pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रेमींच्या तालुकास्तरीय बैठकांचे आयोजन

0 1 7 4 0 8

जालना/प्रतिनिधी,दि.11

महाराष्ट्र शासनाच्या, क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जालना व जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सन 2023-24 या वर्षाकरिता एकुण 90 खेळाच्या शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. 90 खेळाच्या जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. तसेच तालुकास्तरावर शालेय कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल, मैदानी, क्रिकेट, बुध्दीबळ, कॅरम, योगा, कुस्ती या दहा खेळाचे आयोजन करण्यात येत असते.  तालुकास्तर शालेय क्रीडा स्पर्धासाठी तालुक्यातील क्रीडा संघटक, क्रीडा शिर्षक, क्रीडा प्रेमी यांनी उपरोक्त तालुका क्रीडा अधिकारी व तालुका क्रीडा स्पर्धा संयोजक यांचेशी संपर्क साधून आयोजन व नियोजनासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन  जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे.
तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या तालुकास्तर शालेय क्रीडा स्पर्धा 2023-24 चे आयोजन व नियोजन करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना मार्फत पुढील प्रमाणे बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. दि. 11 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 02.00 वाजता जिल्हा परिषद प्रशाला भोकरदन, ता. भोकरदन, सकाळी 11.00 वाजता सिध्दार्थ महाविद्यालय, जाफ्राबाद ता. जाफ्राबाद, दि. 17 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता पंचायत समिती, मंठा, ता. मंठा, दि. 17/08/2023 रोजी दुपारी 02.00 वाजता गट साधन केंद्र, परतुर ता. परतुर, दि. 18/08/2023 रोजी सकाळी 11.00 वाजता सावित्रीबाई फुले विद्यालय, अंबड, ता. अंबड, दुपारी 02.00 वाजता गट साधन केंद्र, घनसांवगी, ता.घनसांवगी, दि. 23/08/2023 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा परिषद प्रशाला मुलांची, जालना ता. जालना, दुपारी 02.00 वाजता साई मॉडर्न स्कुल, बदनापूर ता. बदनापूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे