pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

धनगर समाजाची एसटी आरक्षणात अंबलबजावनी करा अन्यथा परिणाम भोगवे लागतील- राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष सक्षणा सलगर यांचा शासनाला इशारा

0 3 8 6 5 4

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.25

राज्यातील धनगर समाजाची एसटी आरक्षणात अंमलबजावणी करावी ही मागणी आजकालची नसून गेल्या वर्षानुवर्षांपासून मागणी सुरू आहे .संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या अमृता पासून धनगर समाजाला गेल्या ७५ वर्षापासून राज्यकर्त्यांनी झुलत तथा वंचित ठेवले आहे .मात्र आता जोपर्यंत धनगर समाजाची एसटीमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत समाज स्वस्थ बसणार नाही असा एल्गार राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी जालना येथे २४ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या इशारा मोर्चाप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधतांना केला .
यावेळी उपोषणकर्ते तथा धनगर योद्धा दीपक बोऱ्हाडे यांच्यासह जाफराबाद, गोंधनखेडा, टेभूर्णी छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर , अंबड,जालना बदनापूर, धाराशिव यांच्यासह राज्यातील ग्रामीण तथा शहरी भागातील सकल धनगर समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होते .
पुढे बोलताना सलगर म्हणाल्या की लोकसभा विधानसभा निवडणुकीआधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता की सत्तेवर येताच पहिल्याच कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण देऊ मात्र त्यांचे सरकार सत्तेवर येऊन आज एका वर्षाचा काळ लोटला असून त्यांना धनगर आरक्षणाचा विसर पडला आहे मात्र येणाऱ्या काळात जर समाजाला योग्य नाही मिळाला तर समाजामध्ये उद्रेक निर्माण होईल व समाजातील युवक कोणालाही जुमानणार नाही त्यामुळे शासनाने आता वेळ न घालवता तात्काळ योग्य निर्णय घेऊन धनगर समाजाची एसटी प्रवर्गात समावेश करून अंबलबजावणी करून एसटीच्या सर्व सोयी सुविधा समाजाला द्याव्या व गेल्या अनंत काळापासून सुरू असलेली ही धनगर आरक्षणाची लढाई पूर्णत्वास न्यावी जर धनगर बाधवांनी तात्काळ एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर गेल्या अनेक वर्षं वर्षापासून समस्याग्रस्त, चिंतातुर,भितीयुक्त, जिवन जगत असलेला समाजबांधव विविध समस्यांनी त्रासलेला असुन त्यांना जर न्याय मिळाला नाही तर त्यांच्या संयमाचा बांध फुटेल व सर्वत्र उद्रेक होईल व नंतर समाजाला आवर घालने ही शासनाला मुश्किलीचे होईल मग शासनाला हे महागात पडेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र तथा राज्य सरकारची राहील म्हणून केंद्र व राज्यात भाजप सत्तेत असल्या ने धनगर आरक्षणाचा प्रश्न फार काही अवघड जाणार नाही म्हणून आता आमचा अंत पाहू नका व आमच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा व धनगर समाज बांधवांना एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावे अन्यथा परिस्थिती बिकट झाली तर याला सर्वस्वी जबाबदार राज्य केंद्र सरकार राहील .
यावेळी त्यांनी धनगर आरक्षणासाठीची लोकशाही मार्गाने लढाई सुरूच आहे त्यामुळे समाजाला एसटी आरक्षणामध्ये प्रवेश मिळणारच आहे यासाठी मात्र संघटीत रहा, आरक्षणासाठी समाज बांधवांनी आत्महत्या करू नका, आपला कुठेही संयम सुटू देऊ नका , आपलं आंदोलन थांबविण्यासाठी काही लोक उचापत्या करतात मात्र अशा काही इतर समाजकंटकांच्या गैरवर्तणूकीमुळे कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न उद्भवणार नाही याची काळजी घ्या व शांततेच्या मार्गाने आंदोलन करा तो आपला न्यायिक अधिकार आहे म्हणून त्याच्यासाठी प्रचंड लढा व आपल्या हक्क अधिकार लोकशाहीच्या मार्गाने मिळवा असे आवाहनही त्यांनी समाज बांधवांना केले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे