pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मराठवाडा शिक्षक संघाची तक्रार निवारण बैठक संपन्न !

४ महिन्यापासून वेतन न मिळालेल्या शिक्षकास मिळाला न्याय !

0 3 1 0 6 1

जालना/प्रतिनिधी, दि.28

दि 27 कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जि प जालना या ठिकाणी माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगला धुपे, प्रभारी वेतनअधिक्षक मकरंद सेवलीकर व माध्यमिक विभागातील संबंधित कर्मचारी तसेच मराठवाडा शिक्षक संघाचे पदाधिकारीआणि तक्रारदार यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत एकूण 20 तक्रारीवर चर्चा करण्यात आली या सर्व तक्रारी 4 जुलै 2024 च्या आत निकाली काढाव्यात अशी संघटनेची आग्रही भूमिका होती त्या नक्कीच निकाली काढण्यात येतील अशी ग्वाही शिक्षणाधिकारी मंगला धुपे यांनी दिली.

वैयक्तिक तक्रारीं मध्ये थकित वेतनावर विशेष चर्चा करण्यात आली यामध्ये बाळासाहेब देविदास लहाने या शिक्षकाचा गेल्या 4 महिन्यापासून मुख्याध्यापक व संस्था चालक यांच्या आडमुठ्या धोरणामुळे तसेच प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि प्रशासनास चुकीची माहिती पुरवल्यामुळे आणि  प्रशासनाने ही मुददामहून त्याची विशेष दखल न घेतल्यामुळे त्यांचे चुकीच्या पद्धतीने समायोजन केल्या मुळे वेतन बंद होते परंतु मराठवाडा शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या तक्रारीचा विशेष पाठपुरावा करत सदरील कर्मचाऱ्यास न्याय मिळवून दिला व बंद असलेले वेतन तात्काळ सुरू करण्यास माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या आदेशाने मुख्याध्यापकास भाग पाडले.

दरम्यानच्या कालावधीत सदरील शिक्षक उपोषणाला सुद्धा बसले होते परंतु तरीही मुख्याध्यापक सदरील शिक्षकास रुजू करून घेण्यास तयार नसल्यामुळे मुख्याध्यापकाचेही  वेतन बंद केले होते त्यानंतर ही मुख्याध्यापकाने शिक्षकास रुजू करून न घेतल्यामूळे शिक्षणाधिकारी यांनी संपूर्ण शाळेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन देयके स्वीकारू नये असे आदेश काढले त्यानंतर शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले की अतिरिक्त शिक्षक रुजू करून घेणे ही शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कार्य कक्षेतील बाब नाही दुखणं म्हशीला ! आणि इंजेक्शन पखालीला !यातला हा प्रकार आहे तेव्हा कुठे शिक्षणाधिकारी यांनी तात्काळ सुनावणी होऊन प्रकरण निकाली काढले.

यावेळी संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवटटे ,सदस्य प्रेमदास राठोड, आरेफ कुरेशी, जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे,जिल्हा सचिव संजय येळवंते, बामुक्टोचे सरचिटणीस व अर्थशास्त्राचे तज्ञ तथा संघटनेचे मार्गदर्शक डॉ मारुती तेगमपुरे,कोषाध्यक्ष नारायण मुंडे,कार्याध्यक्ष फरखुंद अली सय्यद,उपाध्यक्ष  भीमाशंकर शिंदे, जगन वाघमोडे,सहसचिव प्रद्युम्न काकड, दीपक शेरे,प्रसिद्धी प्रमुख हकीम पटेल भगवान धनगे,युवा शहराध्यक्ष सोहम बोदवडे, लोकमत समाचार पत्रकार इम्रान सिद्दिकी हे व इतर पदाधिकारी उपस्थित होते

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
10:09