भोकरदन येथे लोक अदालतीचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.15
उपविभागीय अधिकारी, भोकरदन यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या अर्धन्यायिक प्रकरणांचा निपटारा व्हावा तसेच नागरिकांना जलद न्याय मिळावा या उद्देशाने दि.17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत महसूल सेवा पंधरवाडा अंतर्गत न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून रविवार दि.28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, भोकरदन येथे लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी अर्धन्यायीक प्रकरणामध्ये तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी लोकअदालतीचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रासह वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बी.सरवनन यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.



