लायन्स क्लब ऑफ जालना मर्चंट सिटी व योग साधना परिवार सोनल नगर जालना यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिर

जालना/प्रतिनिधी, दि.7
आज दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी लायन्स क्लब ऑफ जालना मर्चंट सिटी व योग साधना परिवार सोनल नगर जालना यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिर श्री संत गजानन महाराज मंदिर येथे घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी लायन्स क्लब मर्चन्ट सिटी चे अध्यक्ष श्री विनोद वीर, सचिव डॉक्टर सतीशचंद्र प्रभू, योग साधना परिवाराचे योग गुरु व आमचे सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर मकरंदजी बोठे व इतर योग साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या शिबिरामध्ये एकूण 182 जणांचे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण 8 रुग्णांना मोतीबिंदू झालेला आढळला. या सर्व 8 रुग्णांची मोफत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया लायन्स आय हॉस्पिटल चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर येथे पुढील आठवड्यात करण्यात येणार आहे. आजच्या कार्यक्रमासाठी संत गजानन महाराज मंदिराचे सर्व ट्रस्टी व योगसाधना परिवारातील सर्व साधक यांचे मोलाचे सहकार्य लाभले,त्यांच्या परिश्रमामुळे आजचे हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले.



