pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भगवाननगर येथे सोयाबीन उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक

0 1 6 5 1 0

वडीगोद्री/तनवीर बागवान,दि.30

खरीप हंगाम महिन्याभरावर आल्याने बाजारातील बोगस बियाणांने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होवू नये म्हणून अंबड तालुका कृषी विभागाने शेती शाळा आयोजन करुन घरगुती सोयाबीन उगवण क्षमता तपासणी मोहीम राबवण्यात सुरुवात केली असल्याचे तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांनी सांगितले.

भगवाननगर ता.अंबड जि.जालना येथे कृषि विभाग मार्फत जिल्हा अधीक्षक कृषि अधिक्षक जी.आर.कापसे व तालुका कृषि अधिकारी सचिन गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना मार्गदर्शन तसेच शेतकऱ्यांची आर्थिक खर्चावर कसी मात करता येईल व बोगस बियाणांपासून शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये.म्हणून घरगुती सोयाबीन,तुर,मुग,यापिकांची उगवण क्षमता तपासणी मोहीम राबविण्यासाठी प्रात्यक्षिक मोहीम हाती घेतली आहे.

यावेळी अंबड तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी म्हणाले की,बोगस बियाणेमध्ये शेतकरी मोठया प्रमाणात भरडल्या गेल्याने परिणामी बियाणे उगवले उत्पादन झाले नाही.पण शेतीही खाली ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने शेतकऱ्यांना अर्थिक खर्चात बचत करण्यासाठी शेतकरी स्थरावर स्वउत्पादीत घरगुती बियाणांचा वापर वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः कडील राखून ठेवलाले सोयाबीन बियाणाचा उगवण क्षमता तपसण्यासाठी पेरणी अगोदर उगण क्षमता तपासून घेवून प्राधान्य देण्यासाठी गावनिहाय शेतकरी निहाय मोहीम आयोजित करण्यात आली असून घरगुतीसाठा केलेल्या सोयाबीन ची उगवण क्षमता तपासणे.

बीजप्रक्रिया हा एक महत्वाचा घटक असुन आपल्याला चांगल्या गुणवत्ता पूर्ण बियाणांची खात्री पटू शकते.किती बियाणे पेरायचे याचा अंदाज येतो.त्यामुळे शेतकरी हित जोपण्यासाठी कृषी विभागातर्फे पेरणी पूर्वी सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता चाचणी बियाणे साठण कशी करावी, निरोगी सशक्त बियाणांची निवड कशी करावी.घरगुती सोयाबीन उगवण क्षमता तपासणीचे फायदे याबाबत प्रात्यक्षिक मोहीम कार्यक्रम हाती घेण्यात आल्याचे कृषि अधिकारी सचिन गिरी यांनी सांगितले.

तर यावेळी कृषि सहाय्यक विजय जाधव यांनी शेतकऱ्यांना कडील खरिपातील व उन्हाळी हंगामातील घरगुती आपल्या कडील साठवून ठेवलेल्या घरगुती बियांची उगवण क्षमता तपासणी नक्की करावी असे आवाहन केले.यावेळी गावातील शेतकरी बांधव नारायण लाड,जालिंधर शिंदे,जालिंधर सांगळे,गोरक्षनाथ लाड, पोपट लाड,राजेंद्र सुळे,श्रीधर सांगळे,कृषि मित्र चांगदेव लाड इत्यादींची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 6 5 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे