अभिनेते एम.नटराज अभिनीत झोलर शॉर्ट फिल्म चा प्रीमियर सोहळा उत्साहात संपन्न हास्य कलाकार आशिष सातपुते यांनी जिंकली प्रेक्षकांची मने

जालना/प्रतिनिधी, दि.26
आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर मधील शहीद हॉल मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला काही नवीन आणि काही जुन्या कलाकारांनी या शॉर्ट फिल्म मध्ये भुमिका साकारल्या आहेत.झोलर हे नाव वाचूनच प्रेक्षक फिल्म बघण्यास उत्सुक होते एक वेगळा सामाजिक विषय या फिल्म मधुन दाखवण्यात आला आहे . या शॉर्ट फिल्म मध्ये अभिनेते एम. नटराज एका विशेष भूमिकेतून आपणास बघण्यास मिळणार आहेत तर हास्य कलाकार आशिष सातपुते यांची सुद्धा विनोदी भुमिका आपणास या मधुन बघण्यास मिळणार आहे या सोहळ्याला आशिष सातपुते यांनी निवेदक म्हणून काम पाहिले आहे आणि आपल्या निवेदनातून प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावले या कार्यक्रमाला महाराष्ट्र बाजार पेठ संस्थापक अध्यक्ष माननीय कौतिक दांडगे सर,आधार इंडिया चे माननीय अमित दुखंडे सर,शहीद हॉल चे अशोक हिरे सर यांचे विशेष सहकार्य लाभले याप्रसंगी वरद व्हिजन एन्टरटेन्मेंट चे माननीय प्रोडुसर शशिकांत गांगण,दिग्दर्शक विलास राक्षे,असिस्टंट डायरेक्टर सोहन कांबळे,रवी उपाध्याय,आर्ट डायरेक्टर सुरेश गायकवाड,अभिनेते संभाजी माने,निर्माते दिलीप कांबळे,आधार इंडिया इंटरनॅशनल चे अमित दुखंडे सर आदी मान्यवर उपस्थित होते या शॉर्ट फिल्म चे दिग्दर्शन विकी हरनामे यांनी केले आहे , झोल काय असतो हे बघायचे असेल तर नक्कीच झोलर ही शॉर्ट फिल्म बघा.