pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

नेरपिंगळाईच्या शेतकऱ्यांचा मोर्शी तहसील कार्यालयावर मोर्चा:अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यांसाठी आक्रमक

0 3 8 4 4 1

 ता.मोर्शी/प्रतिनिधी,दि.27

नेरपिंगळाई परिसरातील शेतकऱ्यांनी आज तालुक्याचे गाव असलेल्या मोर्शी येथील तहसील कार्यालयावर धडक दिली. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीचे त्वरेने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. संयुक्त किसान मोर्चाचे घटक असलेल्या वेगवेगळ्या पक्षाशी संबंधित शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश होता. सरकार बहिरे आहे का ? शेतकऱ्यांच्या आक्रोश त्यांना का ऐकू येत नाही ? अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात तहसीलदारांना निवेदनही सादर करण्यात आले. यंदा झालेल्या प्रचंड अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सोयाबीन, कपाशी, तूर, भाजीपाला, संत्रा अशी सर्व पिके जमिनीत सडून गेल्याने शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे, अशी मांडणी यावेळी करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. शेतकरी म्हणाले, “आमची पिके वाहून गेली, आम्ही उपाशी राहतोय. पंचनामे करायला अधिकारी नाहीत, नुकसान भरपाईचा निर्णय नाही. सरकार बहिरे आहे का ? शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा आवाज त्यांना का ऐकू येत नाही? दरवर्षी नैसर्गिक आपत्तीचा मार सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ खोट्या घोषणा, पॅकेजेस आणि कर्जमाफीची आश्वासने मिळतात. प्रत्यक्षात मात्र ना योग्य पंचनामे होतात, ना वेळेवर मदत मिळते. शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू व त्यांच्या घरातील चूल विझण्याची वेळ ही प्रशासनाच्या उदासीनतेचे परिणाम आहे, असे खडे बोलही यावेळी सुनावण्यात आले.दरम्यान सरकारने तात्काळ उपाययोजना केली नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला. त्याचवेळी सोयाबीन, कापूस, तूर आणि संत्रा या पिकाला सरसकट पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांचा सातबारा तात्काळ कोरा करावा, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, कापसावरील आयात शुल्क २५ टक्के करण्यात यावे, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, मोर्शी तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, पिक विमा योजना लागू करावी या मागण्याही यावेळी करण्यात आल्या.निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राहुल मंगळे, तालुका काँग्रेस कमिटीचे सुरज अवचार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अश्विन खुरपडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संजय सुने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रफुल उमरकर यांच्यासह माजी जि.प. सदस्य संजय मंगळे, सचिन दिगंबरे, अंकित मावळे, रमेश सुने, गजानन मोहेकर, अरविंद पोटे, लीलाधर पाचघरे, देविदास भोपळे, हरिदास धवने, आशिष धवने, भोजराज मोंढे, राजेंद्र राऊत, राहुल कळसकर इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 4 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे