अंबड शहरासह विविध ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या उजाड माथ्यावर” केसांचा विंग लावून चोऱ्या करणाऱ्या टक्कल्या अखेर जेरबंद
अंबड पोलिसांची कामगिरी

विरेगाव/गणेश शिंदे, दि.30
डोक्यावर अजिबात केस नाही, मात्र, चोरी करायला निघाला की, केसांचा विंग लावूनच काम फत्ते करूनच येणाऱ्या एका भामट्याच्या मुसक्या आवळण्या त अंबड पोलिसांना यश आले आहे.
हा चोरटा कधी केसांचा विंग लावून तर कधी विंग न लावता चोऱ्या करीत असल्यामुळे सीसीटीव्हीमध्ये दिसला तरी त्याला ओळखणे पोलिसांसाठी अवघड झाले होते.
या चोरट्याने मागील दोन महिन्यांपासून अंबड शहरात अनेक चोऱ्या करत, उच्छाद मांडला होता. अखेर त्याला पकडण्यात अंबड पोलिसांना यश आले आहे. हा चोरटा अंबड येथील पाचोड रोडवरील एका पेट्रोल पंपावर विनाक्रमांकाची मोटार सायकल घेऊन विक्री करण्यासाठी आल्याची मिळताच पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. यावेळी या भामट्याने त्याचे नाव मुस्तफा अब्दुल सय्यद (वय 25, रा. चंदनझिरा) असे सांगितले. यावेळी पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याने अंबड शहरात बागडे ज्वेलर्समधील चोरी, आशीर्वाद मेडिकल, साई मेन्स कापड दुकानातील चोरी, पैठण येथून मोटारसायकल व एक स्कुटी आणि पाचोड येथून हार्डवेअर व ऑटो पार्टच्या चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे.
यावेळी पोलिसांनी चंदनझिरा भागातील त्याच्या घरातून चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक चैतन्य कदम, पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ ढाकणे, पोहेकाँ. विष्णू चव्हाण, दीपक पाटील, स्वप्नील भिसे, वंदन पवार, मंजित सिंग सेना, राम मते , अरुण लहाने आदींनी केली आहे.