pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

खोपटे गावात श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र अयोध्या श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न.

0 1 7 4 0 9

उरण/ विठ्ठल ममताबादे,दि.23

हिंदूचे आराध्य दैवत भगवान श्रीराम देवतेचे २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्यामध्ये मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापणाचे औचित्य साधून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उरण तालुक्यातील खोपटे गावातील स्व कै.राम नारायण ठाकुर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करुन श्री प्रशांत भाउ मित्र परीवारा तर्फे खोपटे बांधपाडा डी.पी जवळ श्री राम मंदिर तिर्थक्षेत्र अयोध्या श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते..सोमवार दि २२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८ वा. प्रभू श्रीराम मूर्ती अभिषेक,दुपारी १२ वा.चित्रकला स्पर्धा, दुपारी २ वा. खेळ पैठणीचा, सायं ५ वाजता खोपटे गावातील दिव्यांग व्यक्तींना भेटवस्तू वाटप, सायंकाळी ६ वाजता खोपटे गावा‌तील कला क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा मान सन्मान असे विविध उपक्रम श्री प्रशांत भाउ मित्र परिवाराच्या माध्यमातून राबविण्यात आले.

कार्यक्रमाचं उदघाटन खोपटे गावातील प्रथम महिला नागरीक सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.सदरचा कार्यक्रम हा प्रशांत भाऊ मित्र परिवाराने मागील वर्षी आयोजित केलेल्या स्व.राम स्मृती चषक च्या क्रिकेट स्पर्धेमध्ये झालेल्या नफ्यातून आयोजित करण्यात आला होता . तसेच त्याच्यातुनचं मागील वर्षी गावातील एका गरजू मुलाला आकरावीच्या प्रवेशासाठी मदत करण्यात आली.यावेळी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.चित्रकला स्पर्धेमध्ये एकुण १६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थांना प्रशांत भाऊ मित्रमंडळाच्या वतीने
प्रमाणपत्र देण्यात आले व १,२,३ क्रमांक आलेल्या विद्यार्थांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.खोपटे गावातली एकूण ५९ दिव्यांग व्यक्तींना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.खोपटे गावातील कला क्रीडा संस्कृतीक शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.खेळ पैठणीचा या कार्यक्रमामध्ये विजेत्या महिलांचा पैठणी देऊन सन्मान करण्यात आला.एकूण ६० महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता १,२,३ क्रमांक आलेल्या महिलांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रशांत ठाकूर , जयेश ठाकूर , अमित घरत , स्वप्नील ठाकूर , स्नेहल पाटील, मुकेश ठाकूर, संदेश पाटील , रोशन घरत ,अभय ठाकूर , परेश पाटील ,अजय ठाकूर , तुषार पाटील , समाधान लीलाधर ठाकूर , रोशन ठाकूर , वृषाल घरत, रमेश ठाकूर,चैतन्य ठाकूर, प्रतीक ठाकूर , चेतन ठाकूर, लोकेश ठाकूर , लवेश ठाकूर , मितेश ठाकूर, नितेश ठाकूर , सिद्धार्थ म्हात्रे , निकेश ठाकूर, अतुल ठाकुर , प्रिन्स म्हात्रे , समाधान ठाकूर , मोहन ठाकूर, गजानन ठाकूर,सुरज ठाकूर, चिन्मय ठाकूर,मंडप आणि स्टेज ची मोफत सेवा देणारे अमित घरत आणि स्वप्नील ठाकुर आदी पदाधिकारी सदस्यांनी तसेच ग्रामस्थांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन पाटील यांनी तर आभार प्रदर्शन रोशन घरत यांनी केले. एकंदरीत खोपटे गावात श्री रामप्रतिष्ठापणा सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे