pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत जालना रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे भूमीपूजन संपन्न;केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थितीत जालन्यात पायाभरणी भरीव निधीमुळे महाराष्ट्रात रेल्वेचा विकास वेगाने होत आहे — केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगव्दारे केले मार्गदर्शन

0 1 7 4 0 8

जालना/प्रतिनिधी,दि.7

अमृत भारत स्टेशन योजनेतंर्गत देशभरातील 508 तर त्यापैकी महाराष्ट्रातील 44 रेल्वेस्थानकांसह जालना व परतूर येथील रेल्वे स्थानकांच्या नुतनीकरणाचे भूमीपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ऑनलाईन पध्दतीने झाले. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी मार्गदर्शन केले.
यानिमित्त जालना रेल्वे स्थानकाच्या परिसरात आयोजित कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार कैलास गोरंटयाल, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, विभागीय रेल्वे व्यवस्थापक निती सरकार आदींसह पदाधिकारी व मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, देशात रेल्वेचा विकास जलदगतीने होत आहे. देशातील सुमारे 1 हजार 309 रेल्वेस्थानकांचे नूतनीकरण केले जाणार आहे. त्यापैकी 508 स्थानकांचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाले आहे. या रेल्वे स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील 44 स्थानकांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेच्या आधुनिकीकरणामध्ये मोठे बदल झाले आहेत. मला सांगायला आनंद वाटतो की, यावर्षी महाराष्ट्रासाठी जवळपास साडेबारा ते तेरा हजार कोटी रुपये मिळाले असून त्यामधून रेल्वे विकासाची अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. देशात आणि आपल्या राज्यात लवकरच सर्वच रेल्वे इलेक्ट्रिफिकेशनवर सुरु करणार आहोत.
राज्यात अनेक नवीन रेल्वे मार्गाची कामेही मंजूर करण्यात आली आहेत. सोलापूर ते तुळजापूरपर्यंत एक नवीन रेल्वे मार्ग मंजूर केला आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड नवीन रेल्वे मार्गाचे काम चालू आहे. अहमदनगरपासून आष्टीपर्यंतची रेल्वे सुरू केली. बीडपासून तर परळी मार्गे ती रेल्वे न्यायची आहे. जालन्यापासून जळगावपर्यंत रेल्वे मार्ग केला जाणार आहे. त्याचा डीपीआर तयार झालेला आहे, त्यास रेल्वे बोर्डाने मान्यता दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.
श्री. दानवे पुढे म्हणाले की, देशात अत्याधुनिक अशा 25 वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पाच वंदे भारत ट्रेन या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेल्या आहेत. रेल्वेने रोजगाराचीही मोठी संधी उपलब्ध केली आहे. लातूरला एक कोच फॅक्टरी उभी करण्यात आली. त्या कोच फॅक्टरीमध्ये मोठया प्रमाणात कोचचे काम होत असून अनेकांना रोजगाराची संधी मिळाली आहे.
जालन्यातील नवीन रेल्वस्थानकाबाबत बोलताना श्री. दानवे म्हणाले की, सुमारे 182 कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात येणाऱ्या जालन्यातील रेल्वे स्थानकाचे आकर्षक असे अत्याधुनिकीकरण केले जाणार आहे. सर्वसुविधांनीयुक्त असे हे स्थानक असेल. या रेल्वस्थानकाच्या दोन्ही बाजुंनी प्रवाशांना येता येईल. पर्यावरण पूरक असणाऱ्या या इमारतीत दिव्यांगांना अनुकूल सुविधा, वाय-फायची तरतूद असेल. अतिशय दर्जेदार असे हे रेल्वेस्थानक असेल. जालन्यामध्ये पीटलाईनचे कामही वेगाने सुरु आहे. तसेच जालन्यातून वाराणसी, पुणे आणि तिरुपतीला जाण्यासाठी नवीन रेल्वे गाडयाही सुरु करण्यात आल्या आहेत.
यावेळी आमदार कैलास गोरंटयाल, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विभागीय रेल्वे व्यवस्थापक निती सरकार यांनी केले. प्रारंभी शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिस वाटप करण्यात आले.
जालना रेल्वे स्थानकाचे अद्ययावतीकरण – जालना हे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख रेल्वे स्थानकांपैकी एक असून, 182 कोटी रुपये खर्चून सध्याच्या आणि भविष्यातील प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्टेशन रीडेव्हलपमेंटसाठी निवडले गेले आहे. प्रवाशांना उत्तम सुविधा याव्दारे दिल्या जाणार आहेत. स्थानक पुनर्विकासासह एका मोडमधून दुसऱ्या मोडमध्ये प्रवाशांच्या अखंड हस्तांतरणासाठी स्थानक परिसरातील वाहतुकीच्या अनेक पद्धती एकत्रित केल्या जाणार आहेत. स्थानकाच्या दोन्ही बाजूंना जोडण्यासाठी दक्षिण बाजूची एंट्री (प्रवेश) देखील देण्यात येणार आहे. रेल्वे प्रवाशांची उत्तम कनेक्टिव्हिटी आणि गतिशीलता, प्रवाशांसाठी सोयीस्कर पिकअप आणि ड्रॉप ऑफ क्षेत्रे, पुरेशी पार्किंग सुविधा या इतर सुविधा आहेत. सरकुलेटिंग एरिया गजबजलेले असेल आणि व्यवसायाच्या संधींच्या निर्मितीसह शहराच्या रस्त्यांच्या नेटवर्कशी एकत्रित केले जाईल. जालना स्थानकाच्या पुनर्विकासामुळे जागतिक दर्जाच्या सोयी आणि सुविधांसह वर्धित अनुभव मिळेल ज्यामुळे भविष्यात वाढणाऱ्या प्रवाशांच्या गरजा पूर्ण होतील.
प्रस्तावित सुविधा – सध्याच्या 3,900 चौ.मी.च्या तुलनेत प्रस्तावित स्थानक इमारत क्षेत्राचे 21,736 चौ.मी. स्टेशन इमारत क्षेत्र उत्तर स्थानक इमारत: 18,511 चौ.मी. आणि दक्षिण स्थानक इमारत 3,225 चौ.मी. टर्मिनल बिल्डिंग आणि सर्व प्लॅटफॉर्मला जोडणारा 72 मीटर डबल लेव्हल एअर कॉन्कोर्स. रूफ प्लाझा 2,952 चौ.मी. (72×41 मीटर) आणि छताचे आवरण क्षेत्र: 14,575 चौ.मी. निर्गमन आणि आगमन प्रवाशांचे पृथक्करण. सर्व प्लॅटफॉर्म मध्ये सुधारणा. भविष्यातील विकासासाठी मल्टी लेव्हल कार पार्किंगसाठी तरतूद ठेवण्यात आली आहे. वेटिंग कॉन्कोर्स क्षेत्र: 2,592 चौ.मी. फुट ओवर ब्रिज 4 (आगमनासाठी 2 आणि निर्गमन प्रवाशांसाठी 2). लिफ्ट: 13, एस्केलेटर: 12. बहुभाषिक तिकीट पोर्टल. छतावर सौर पॅनेलसह पर्यावरण पूरक बिल्डींग. दिव्यांगांसाठी अनुकूल सुविधा. वायफायची सुविधा. इतर सुविधा जसे की लॅपटॉप,मोबाइल चार्जिंग पॉइंट्स, फार्मसी आणि वैद्यकीय सुविधा, प्रीपेड कॅब सुविधा, फूड कोर्ट झोन, शॉपिंग एरिया आणि केंद्रीकृत सीसीटीव्ही मॉनिटरिंग प्रणाली असेल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे