स्त्रीशक्ती फाउंडेशन अंतर्गत “गणेशमुर्ती”बनविण्याच्या कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद

पुणे/आत्माराम ढेकळे,दि.17
पुणेः-येथील स्त्रीशक्ती फाउंडेशन अंतर्गत “शाडुच्या मातीपासुन गणेशमुर्ती “बनविण्याची कार्यशाळा नुकतीच पिंपरी चिंचवड येथे संपन्न झाली.त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला.
पिंपरी चिंचवड येथील सेक्टर १८मधील ‘कम्युनिटी हाॕल’शिवाजी पार्क येथे स्त्रीशक्ती फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ.अर्चना ईश्वर सोनार यांनी “शाडुच्या मातीपासुन गणेशमुर्ती “बनविणे(इको फ्रेंडली)या कार्यशाळेचेआयोजन केले होते.या कार्यशाळेत ७०ते ८०मुले-मुली यांनी भाग घेतला होता.शाडु गणपती बनविण्यासाठी प्रामुख्याने शाडुची माती,पाणी,जाड पुठ्ठा/प्लायवुड,छोटा ब्रस,डेकोरेशन साहित्य ,रंगाचे साहित्य आदी साहित्य होते.या कार्यशाळेत प्रथमेश गणपती आर्ट चे संचालक व प्रसिद्ध गणेशमुर्ती बनविणारे गोकुळ कुंभार हे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उपस्थित होते.त्यांनी याप्रसंगी दोन प्रकारचे गणपती कसे बनवितात.त्यामध्ये पहिला तर दगडी साच्यापासुन व हाताने मातीपासुन गणपती कसा तयार करावा.तसेच शाडुची माती कशाप्रकारे गाळुन पाण्याने भिजवुन ठेवावी.मग त्याला कशाप्रकारे मळावे.नवे वेगवेगळे आकार करुन कशा पध्दतीने मुर्ती बनवावी.हे सर्व प्रत्यक्ष कृतीतुन सांगितले .व सहभागी मुले-मुलींना कृतीनंतर मार्गदर्शन करतांना अनेक प्रकारे मुर्ती कशी बनवावी ,रंग कसा द्यावा, काम कसे करावे,दागिणे कसे करावेत त्याच बरोबर डोळ्यातील हावभाव कसे पाहिजे अशा अनेक बाबीवर त्यांनी सांगितले .तसेच या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकुर व अध्यात्मिक गजानन बाल संस्कार केंद्राचे सार्थक कर्णे व समर्थ कर्णे या दोन मुलांनी हातानी मुर्ती कशी बनवावी हे शिकविले.आयोजक अर्चना सोनार यांनी कार्यशाळेत प्रदुषनमुक्त शाडुच्या मातीपासुन गणपती बनविण्याचे फायदे सांगुन आपले भारतीय संस्कार ,देवाची प्रतिमा,पुजा विधी आदीबाबत मुलांना आपल्या मनोगतातुन माहिती दिली.व सर्वांचे आभार मानले.आयोजित कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने सौ.वैशाली जाधव,सौ.अंजली सराफ ,सौ.रेखा महिंद्रकर,सौ.प्रतिभा गुरव,सौ.आरती जोशी,सौ.श्रुती देसाई,सौ.सुप्रिया देसाई ,सौ.शुभांगी विभांडीक,सौ.भारती भोळे,सौ.कल्पना पाटील आदींनी परिश्रम घेतले.