pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

श्रीमती मैनामायी माध्यमिक विद्यालयात तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचेआयोजन

गट शिक्षणाधिकारी श्री डी एन क्षीरसागर याच्या हस्ते उद्घाटन

0 1 7 4 0 9

जालना/प्रतिनिधी, दि.20

बदनापूर : आज ( दि.18) रोज सोमवारी या दिवशी श्रीमती मैनामायी माध्यमिक विद्यालय धोपटेश्वर ता बदनापूर जि.जालना या विद्यालयात: तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनआयोजित करण्यात आले होते हे विज्ञान प्रदर्शन गट शिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती बदनापूर आणि श्रीमती मैनामायी माध्यमिक विद्यालय धोपटेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते सकाळी ११:०० वा गट शिक्षणाधिकारी श्री डी एन क्षीरसागर साहेब याच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी बीट बदनापूर श्री विलास राजगिरे साहेब हे होते तर प्रमुख पाहुणे श्री डी एन क्षीसागर साहेब हे होते तसेच यावेळी प्रमुख उपस्थिती धोपटेश्वर सरपंच श्री ताराचंद फुलमाळी संस्थेचे डायरेक्टर श्री भाऊसाहेब पाटील शेळके तसेच श्री आर एम देशमुख केंद्रप्रमुख खामगाव श्री बालाजी मदन सर, श्री साई सर, श्री गिरशेटी सर, साधन व्यक्ती पं. स. बदनापूर हे उपस्थित होते तर परीक्षक म्हणून श्री प्रा. देवेंद्र देशमुख सर, श्री प्रा मुस्तफा दंडू सर, श्री धोपटे आर एम सर, श्री विनोदकुमार पांडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले

सर्व प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे याच्या हस्ते दिप प्रज्वलन करून आणि सावित्रीबाई फुले तसेच गणित तज्ञ शास्त्रज्ञ श्री निवास रामानुजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सरस्वतीचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी तालुक्यातील जवळ पास 60 शाळातील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचे पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला मुख्याधापक श्री बनकर डी के यांनी गटशिक्षणाधिकारी श्री क्षीरसागर साहेब यांचा पुष्पहार घालून सत्कार केला तर श्री चव्हान सर यांनी राजगिरे साहेब यांचा सत्कार केला, श्री शेजूळ सर यांनी देशमुख सर यांचा सत्कार केला, तर साबळे सर यांनी राजगिरे साहेब यांचा सत्कार केला, श्री बायभट सर यांनी बालाजी मदन सर, गिरशेटी सर यांचा सत्कार केला, श्री देहुढे सर यांनी साधन व्यक्ती श्री साई सर यांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात तसेच उपस्थित सर्व शिक्षक यांचा गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले

सत्कार समारभ आटोपल्यानंतर अध्यक्ष व प्रमुख पाहुणे क्षीरसागर साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले श्री आर एम देशमुख यांचे भाषण झाले तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात इयत्ता ६ ते ८ प्राथमिक व ९ ते १२ माध्यमिक असे दोन गटातील प्रयोग समाविष्ट करण्यात आले होते ६ ते ८ या प्राथमिक गटातून तीन क्रमाक काढण्यात आले

प्राथमिक गटात सार्थक गजानन कान्हेरे शिवाजी हायस्कूल गेवराई (बा),हँड स्प्रेड खत प्रथम क्रमांक, सोनल संजय कडोस सोनमाता मा व उच्च माध्यमिक विद्यालय वि.डासला द्वितीय क्रमांक तर आदित्य रामराव जगताप प्रा. शा. घोटन बायोगॅस व सेद्रीय कृषी तृतीय क्रमांक, माध्यमिक गट सुमती सुभाष खकाळ राजुरेश्वर वि.नानेगाव प्रथम क्रमांक आनंद उत्तम गिते साईबाबा मा. अकोला (नि.) फिरते सौर द्वितीय क्रमांक व ओकार बबन शेळके छ. शिवाजी हा. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे प्रत्येकी तीन प्रयोग जिल्हास्तरीय विज्ञान प्रात्यक्षिकासाठी पात्र ठरले.

शेवटी विजयी स्पर्धकांना प्रमाण पत्र व पुष्पहार घालून गौरविण्यात आले प्रमुख पाहुण्याच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पाडला शेवटी श्री. डी एन क्षीरसागर साहेबानी विजयी विद्यालयाचे कौतुक व अभिनंद केले व पुढील स्पर्धेसाठी सुभेच्या दिल्या हा कार्यक्रम येशस्वी होण्यासाठी श्रीमती मैनामायी माध्यमिक विध्यालायाचे मुख्याधापक श्री डी. के. बनकर सहशिक्षक श्री. चव्हाण सर. श्री. साबळे सर. श्री. वायभट सर.श्री देहडे सर.श्री.ए.बी. दाभाडे.श्री.जी.आर. खेलबाडे यांनी फार परिश्रम घेतले या कामी गटशिक्षणाधिकारी श्री डी एन क्षीसागर साहेब शिक्षण विस्तार अधिकारी श्री. राजगिरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे