pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आ.कैलास गोरंटयाल यांच्या संपर्क कार्यालयात आज काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्त्यांची बैठक

0 1 7 5 5 0
जालना/प्रतिनीधी,दि.22
जालना लोकसभा मतदार संघातील इंडिया (महविकास)आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ जालना विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक उद्या दि.२३ एप्रिल मंगळवार रोजी दुपारी १२.३० वाजता आ.कैलास गोरंटयाल यांच्या प्रितीसुधा नगर मधील संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीत जालना लोकसभेचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांच्या प्रचाराचे नियोजन आणि इतर विषयावर आ.गोरंटयाल हे उपस्थीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.जालना शहर व विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी या बैठकीस मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जालना शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमुद,जालना तालुकाध्यक्ष वसंत जाधव,शहर काँग्रेसचे अध्यक्ष वैभव उगले,जिल्हा उपाध्यक्ष राम सावंत,न.प.चे माजी गटनेते गणेश राऊत आदींनी केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 5 5 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे