अभिनेते एम.नटराज यांचे बॉलिवूड मध्ये दमदार पदार्पण दिग्दर्शक महेश्वर तेटाम्बे यांच्या आखिर “सच उगल दिया” वेब सिरीज मधुन आपल्या भेटीस

जालना/प्रतिनिधी,दि.5
अभिनेते एम.नटराज आता पर्यंत मराठी चित्रपट,सीरियल,शॉर्ट फिल्म,स्कीट या मध्येच आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत होते पण त्यांची इच्छा असून सुद्धा त्यांना हिंदी भाषेत काम मिळत नव्हते,परंतु त्यांना ही संधी दिग्दर्शक महेश्वर तेटांबे यांनी त्यांच्या”आखीर सच उगल दिया” या क्राईम वेब सिरीज मध्ये अभिनय सादर कण्याची संधी दिली गेल्या काही दिवसापासून ते शॉर्ट फिल्म मध्ये व्यस्त होते या शॉर्ट फिल्म मध्ये प्रामुख्याने त्यांनी झोलर, आशिष सातपुते दिग्दर्शित माझा काय गुन्हा,तर त्यांनी स्वतः दिग्दर्शित केलेली पेनकिलर या शॉर्ट फिल्म चा समावेश आहे या पैकी शशिकांत गांगण निर्मित पेनकिलर ही शॉर्ट फिल्म 7 नोव्हेंबर 2024 रोजी वरद व्हिजन एंटरटेनमेंट या You Tube चॅनल वर प्रदर्शित होणार आहे तर आशिष सातपुते दिग्दर्शित ” माझा काय गुन्हा” ही शॉर्ट फिल्म आशिष सातपुते या You Tube चॅनल वर प्रदर्शित झाली आहे.