pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जालना जिल्हा कॉपीमुक्तीसाठी पोलिसांची भुमिका महत्वाची

0 4 0 4 1 6
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.4

जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) दि.10 फेब्रुवारी ते दि.18 मार्च 2026 तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) दि.20 फेब्रुवारी ते दि.18 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी 37 हजार 338 विद्यार्थ्यांसाठी 79 परीक्षा केंद्र  आहेत. इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी 32 हजार 433 विद्यार्थ्यांसाठी 102 परीक्षा केंद्र आहेत. सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली होणार असून जिल्ह्यातील संवेदनशील बारावीच्या 8 तर दहावीच्या 4 अशा एकुण 12 परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार असून चित्रीकरणही करण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातील दहावी, बारावीच्या परीक्षा भयमुक्त वातावरणात व पारदर्शक होणे गरजेचे असल्याने जालना जिल्हा कॉपी मुक्तीसाठी पोलिस विभागाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, तरी जिल्ह्यातील  संवेदनशिल परीक्षा केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवून गैरप्रकाराला आळा घालावा. परीक्षा केंद्राच्या परिसरात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी अतिशय दक्षता बाळगावी. परीक्षा कालावधीत पोलिस विभागाने वेळोवेळी सहकार्य करावे, अशा  सुचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत दिल्या.

              या बैठकीस सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस ठाण्याचे प्रमुख ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 1 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे