शिवराज युवा प्रतिष्ठानतर्फे आम्ही उरणकर विद्युत रोषणाईच्या नामफलकाचे अनावरण.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.14
शिवराज युवा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक,साहित्यिक, धार्मिक उपक्रम राबविले जातात.उरणच्या नागरिकांना तसेच बाहेरून इतर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना उरणचा अभिमान वाटावा,उरण विषयी आदर प्रेम आपुलकी निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून शिवराज युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून उरण शहरातील उरण मोरा रोडवर मनसेच्या कार्यालयाजवळ आम्ही उरणकर नावाच्या विद्युत रोषणाई असलेल्या नाम फलकाचे अनावरण करण्यात आले.
आम्ही उरणकर या नाम फलकाचे उदघाटन उरण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे,नगर परिषदेचे अभियंता झुंबर माने, भाजपा तालुकाध्यक्ष रवीशेठ भोईर, शेतकरी कामगार पक्षाचे महिला तालुकाप्रमुख सीमा घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा शिवराज युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश ठाकूर,मनसे तालुकाप्रमुख सत्यवान भगत,अल्पेश कडू,राकेश भोईर, हेमंत म्हात्रे,धनंजय मोरे,राजेश सरफरे,सुप्रिया सरफरे,अनघा ठाकूर, दिनेश हळदणकर,गणेश तांडेल, योगेश म्हात्रे, उमेश वैवडे, दत्ता पाटील, सचिन ढेरे,अभिजीत पाटील, सामाजिक कार्यकर्त्या नयना पाटील, ठाकूर मॅडम , पूजा प्रसादे, भाग्यश्री साठे, केदार साठे,सुयोग ठाकूर, दीपक प्रसादे, गणेश पुरव,ओम शेरे, हितेश साळुंखे, प्रशांत शिरधनकर,सचिन भोईर, सागर कांबळे,सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ठाकूर, मंगेश धोत्रे, मनोहर नाखवा, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, हितेश शहा, समद मुल्ला, अनिकेत पाटील ,कौशिक भोईर ,मी उरणकर ढोलताशा पथकाचे सर्वेसर्वा विशाल पाटेकर, विकास पाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.आम्ही उरणकर हे नाव विद्युत रोषणाईने सजविले असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे, नागरिकांचे हे नामफलक लक्ष वेधून घेत आहे. सुंदर व आकर्षक अशा आम्ही उरणकर या विद्युत रोषणाईच्या नामफलकामुळे उरणच्या सौदर्यात भर पडली आहे.