शाळा पूर्वतयारी मेळावा क्र.२ प्रा.शा.उखळी येथे उत्साहात संपन्न.

सिंधीकाळेगाव/श्याम गिराम, दि.26
दिनांक 27-06-2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उखळी केंद्र सावंगी तलान येथे शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक ०२ अतिशय आनंदी,खेळीमेळीच्या वातावरणात घेण्यात आला. यावेळी शाशन परिपत्रकानुसार गांवस्तरावर प्रभात फेरी काढण्यात आली.या वेळी शैक्षणिक वर्ष २०२३ मधे इयत्ता १ ली मधे दाखलपात्र मुलाना व पालकाना सहभागी करण्यात आले.उपक्रमाच्या अनुशंगाने मेळाव्या मधे पाच स्टॉल लावण्यात आले या स्टॉल वर नाव नोंदनी.शारीरिक विकास,बौद्धिक विकास,सामाजिक व भावनिक विकास,भाषा विकास,गणनपूर्व तयारी,तसेच पालकाना मार्गदर्शन या प्रमाणे मार्गदर्शन याप्रमाणे स्टॉल लावण्यात आले होते.प्रत्येक स्टॉल वर बालकांच्या कृतीच्या नोंदी घेण्यात आल्या.बालकांच्या शालापूर्व तयारी करीता पालकाना शाळे कडून उपलब्ध साहित्याच्या आधारे ८ ते १० आठवड़े बालकांच्या शालापूर्व तयारीचे नियोजन करण्याचे आव्हान करण्यात आले.यादरम्यान शाळेतील शिक्षक व आंगनवाड़ी सेविका व गावातील शिक्षित स्वयंसेवक यानी पालकाना मदत करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.या वेळी सावगी तलान केंद्राचे आदर्श केंद्रप्रमुख भागवत जेटेवाड़ यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप राठोड़ व सर्व सदस्य,अंगनवाड़ी सेविका मनकरना डोके,लक्ष्मण राठोड़,सुरेखा जाधव, शाळेचे मुख्याध्यापक राहुल डासाळकर,सहशिक्षक नारायण माहोरे,गणेश जाधव व मदतनीस, तसेच गावातील माता पालक, शिक्षक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.