जालना येथील जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती
उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बँकेचे अध्यक्ष सतीश टोपे,बँकेचे
कार्यकारी संचालक आशुतोष देशमुख यांनी दीप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण
केले. यावेळी उपस्थितांचे स्वागत मुख्य शाखेचे व्यवस्थापक सदशिव कोल्हे
यांनी केले. शिवजयंती निमित्त विभागप्रमुख कांता भुतेकर, भागवत भांदर्गे,
विश्वनाथ जाधव, सुरेश केसापुरी, कॅशियर किशोर खिल्लारे, काकासाहेब
भडांगे, सचिन आंबेकर, अविनाश टपरी, संजय खरात, सतीश लोमटे, मकरंद
दाभाडकर, श्याम पवार, रामसिंग राठोड, संदीप राठोड, सुभाष गोडबोले, प्रकाश
लांडगे तसेच बँकेचे कर्मचारी आणि आयटी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
आभार प्रदर्शन मुख्य शाखा व्यवस्थापक सदाशिव कोल्हे यांनी केले.