संत शिरोमणी गोरोबा काका मंदिर मुर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा
दि.11फ्रेबु. 2024 रोजी हभप राम महाराज पांगरेकर यांच्या कीर्तनाने होणार

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.8
नांदेड शहरातील लातुर फाटा, आंबेडकर चौक, रिलायन्स टॉवरच्या पाठीमागे,सिडकोनांदेड
येथे संत शिरोमणी वैराग्यमुर्ती गोरोबा काकाचे भव्य दिव्य मंदिर प्रथमच नांदेड जिल्ह्यात होत आहे. या मंदिरात विठ्ठल रूकमीनी,संत ज्ञानेश्वर माऊली,संत तुकाराम महाराज,संत गोरोबा काका या पाच मुर्तीची प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा दि.11 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10.11 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर आयोजित केला आहे. त्यानिमित्य खालिल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुर्ती प्राणप्रतिष्ठा महाअभिषेक दि.10फ्रेबु.2024 रोजी सकाळी 9.02 मिनिटाला होईल. रात्री 8 ते 10 वाजता हभप कान्होपात्रा यांचे किर्तन होईल .
दि. 11 फ्रेबु.2024 रोजी सकाळि 10.11 मिनिटाला कलशारोहण मठाधिपती 108 श्री नरेंद्र गऐबइ महाराज भारती मठसंस्था पानभोसी या.कंधार यांच्या हस्ते होईल.
त्यांनतर हभप.राम महाराज पांगरेकर यांचे सकाळि 10 ते 12 पर्यंत किर्तन होईल त्यानंतर महाप्रसाद होईल.
कीर्तनाला साथ :– गायनाचार्य रामभाऊ नवलगावकर,सुभाष महाराज वानखेडे,संतोष महाराज मस्के,
मृदंगाचार्य :– कार्तिक महाराज लेकुळे.
मुर्ती प्राणप्रतिष्ठा,होमहवन गुरूवर्य महारूद्र धोंडोपंत जोशी माळकौठेकर ईतर ब्राम्हणवंध्द यांच्या हस्ते होईल.
विशेष सहकार्य आम्हि वारकरी सेवाभावी संस्था पदाधिकारी महाराष्ट्र जिल्हा नांदेड
रावसाहेब पा.शिराळे दतराम पा.येडके,गंगाधरराव हंबर्डे, व्यंकटराव जाधव,प्रभाकरराव पुय्यड,प्रविन महाराज पार्डिकर सर्व आम्हि वारकरी परिवार ,कुंभार समाजातील पदाधिकारी यांना सर्व सदभक्तनी होत असलेल्या ज्ञानयज्ञात सहभागी व्हावे असे
आव्हान स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष विजयराव देवडे लहानकर व संस्थापक सचिव शिवाजी पांगरेकर व समस्त कुंभार समाज नांदेड च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे .
असे प्रसिध्दीपत्रक आम्ही वारकरी परिवार जिल्हाप्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर यांनी दिले.