pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अतिवृष्टी च्या मदतीची रक्कम त्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना द्या – अमोल राठोड

0 1 1 8 3 4

विरेगाव / गणेश शिंदे, दि.4

२०२२ मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले होते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी मदत जाहीर केली होती त्यानुसार कृषी सहाय्यकांना शेतकऱ्यांचे बँक खाते आधार क्रमांक व अन्य माहिती असलेल्या याद्या तयार करून शासनाच्या पोर्टलवरील विहित वेळेत अपलोड करण्याचे निर्देश महसूल प्रशासनाने दिले होते जालना तालुक्यातील 14 कृषी सहाय्यकाने 15 गावांमधील शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड केले नसल्याचे समोर आले आहे.या बाबत कृषी सहाय्यकांवर गुन्हेही प्रशासनामार्फत दाखल करण्यात आले आहे परंतु या प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे.मागील अनेक दिवसांपासून शेतकरी ही मदतीच्या रक्कमेची वाट बघून आहे तहसील प्रशासनाला विनंती आहे की शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नये व त्वरीत विनाविलंब शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करावी.
या करीता गोर सेने मार्फत निवेदन देण्यात आले निवेदन देते वेळी गोर सेनेचे तालुका अध्यक्ष अमोल राठोड,ज्ञानेश्वर गुणारे(सरपंच सोलगव्हाण),विजय राठोड(उपसरपंच सोलगव्हाण) गुलाब राठोड,विनाक राठोड,मारोती चव्हाण,कृष्णा चव्हाण,सचिन राठोड
हे उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4

Related Articles