विविध आपत्तीसंदर्भात जनजागृती मॅरेथॉन रॅलीस उर्त्स्फूत प्रतिसाद

जालना/प्रतिनिधी,दि.7
विविध आपत्ती संदर्भात जनजागृतीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने जालना शहरातून काढण्यात आलेल्या मॅरेथॉन रॅलीस खेळाडुंचा उर्त्स्फूत प्रतिसाद लाभला. या रॅलीत विविध शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसह राष्ट्रीय कॅडेट कोअर, राष्ट्रीय सेवा योजना, होमगार्ड व स्काऊट गाईडचे विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला.
आज सकाळी 7.00 वाजता जालना शहरातील मंठा चौफुली येथून मॅरेथॉन रॅलीस तहसीलदार छाया पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ झाला. यावेळी क्रीडा अधिकारी डॉ. रेखा परदेशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिपक काजळकर उपस्थित होते. प्रारंभी सर्व सहभागी विद्यार्थी, खेळाडू यांची नोंदणी करण्यात आली. सहभागी खेळाडुंना प्रमाणपत्र, टि-शर्ट व कॅप देण्यात आली होती.
या मॅरेथॉन स्पर्धेत मुलांमधून जेईएस महाविद्यालयाचा नितीन दिलीप पवार याने प्रथम, क्रीडा प्रबोधिनीचा आकाश रामेश्वर राठोड याने व्दितीय आणि पार्थ सैनिकी शाळेचा मोहित चरणसिंग मेहेर या विद्यार्थ्याने तृत्तीय क्रमांक मिळवला. तर मुलींमधून अंकुशराव टोपे महाविद्यालयाची गिता रामेश्वर राठोड प्रथम, जेईएस महाविद्यालयाची अंजली दत्ता लघुखरे व्दितीय आणि अंकुशराव टोपे महाविद्यालयाची विद्यार्थीनी प्रिती समाधान शिंदे हिने तृत्तीय क्रमांक मिळवला. या सर्व विजेत्या खेळाडुंना दि. 12 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात येणार आहे.