pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मनसे पनवेल तालुकाध्यक्ष रामदास पाटील यांच्या प्रयत्नामुळे हर घर जल योजना पोहोचली घराघरात.

0 1 7 4 0 8

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.1

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली , तसेच युवा नेते अमित साहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून व आमदार राजू दादा पाटील यांच्या नेतृत्वात पनवेल तालुक्याचे डॅशिंग नेतृत्व असणारे पनवेल तालुका अध्यक्ष रामदास भाई पाटील यांनी RAMKY FOUNDATION यांच्या सहकार्याने हर घर जल ही योजना घरोघरी पोहोचवण्याचे खऱ्या अर्थाने काम केले आहे. वावंजे, नितळस, निताळे , चाळ , नागझरी, देवीचा पाडा, घोट ,घोट कॅम्प, चिरड, इत्यादी गावांना होणारा अशुद्ध पाण्याचा पुरवठा यामुळे मानवी जीवनास धोका उदभवत होता.त्यामुळे रामदास भाई पाटील यांना फाउंडेशन मार्फत अनेक कामे करून घेण्याची संधी होती परंतु त्यांनी मानवी जीवनात उपयुक्त व आरोग्यास लाभदायक असणारी गोष्ट म्हणजेच प्युअर वॉटर प्लांट याची मागणी करून ती पूर्णत्वास नेऊन नितलस गावामध्ये वॉटर एक्वा प्युअर प्लांटचा शुभारंभ करण्यात आला. तसेच मैदानी खेळांमध्ये क्रमांक पटकावणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा देखील करण्यात आला. रामदास भाई पाटील यांच्या या कार्याला आज समाजातून खूप साऱ्या शुभेच्छा मिळाल्या आहेत.
तसेच या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित रायगड उपजिल्हा अध्यक्ष प्रवीणजी दळवी, कोकण विभागीय रस्ते व आस्थापणा संजयजी तन्ना , महाराष्ट्र राज्य रोजगार व स्वयंरोजगार चिटणीस सोनी बेबी , पनवेल तालुका अध्यक्ष रामदास भाई पाटील ,पनवेल तालुका महिला अध्यक्ष रेखाताई , पनवेल उपतालुकाध्यक्ष कैलास दादा पाटील ,चिंतामणीशेठ मुंगाजी, नितलस ग्रामपंचायत उपसरपंच श्री.दरे , निकलस ग्रामपंचायत सदस्य विशाखा ताई , वावंजे विभाग अध्यक्ष अमोल हरिश्चंद्र पाटील, रीटघर विभागाध्यक्ष गुरुनाथ गोपी, वावेघर विभाग अध्यक्ष नितेश भोईर , उलवे शहर सुनील कोळी तसेच मनोज कोळी, मनसे भातान शाखा अध्यक्ष कु. विजय ठाकूर, निलेश जुमारे, खानावळे शाखाध्यक्ष आकाश पाटील,प्रवीण ठोंबरे , इतर मनसे पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते. दत्तूशेठ पाटील विद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग, राम के प्रायव्हेट लिमिटेड फाउंडेशनचे सर्व स्टाफ, नितलस ग्रामस्थ व महिला ग्रामस्थ मंडळ तसेच वावंजे विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. यातून अनेक गोष्टी समाजास दिसून आल्या की सर्वसामान्यांसाठी झटणारे पनवेल तालुक्यातील डॅशिंग नेतृत्व असणारे रामदास भाई पाटील ही समाजासाठी खरोखर दिवस-रात्र काम करत असतात व याची दखल संपूर्ण पनवेल तालुका घेत आहे व येणाऱ्या पुढील काळात नक्कीच योजना आणखी गावोगावी पोहोचवण्यासाठी रामदास भाई प्रयत्न करतील असे त्यांनी शब्द दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे