शासकीय, निमशासकीय कार्यालयासह विश्रामगृहात सभा घेण्यावर निर्बंध जारी
जालना/प्रतिनिधी,दि.16
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 साठी कार्यक्रम दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित केला आहे. जालना जिल्ह्यात शासकीय , निमशासकीय कार्यालये, संस्था, विश्रामगृहे आदिच्या परिसरात मिरवणूक काढणे, घोषणा देणे, सभा घेण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.
निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे जालनाजिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हादंडाधिकारी,उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या, उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे. सदरील आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे, निवडणूकी संबंधाने पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट, पेंटींग्स, होर्डींग्ज लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहिणे किंवा सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे आणि निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करणे इत्यादी बाबी नियंत्रीत करणे आवश्यक आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वयेमला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन या आदेशाव्दारे वरील ठिकाणी वरील प्रमाणे कृती करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहे. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे