pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्यांविरुध्द जिल्हा प्रशासनाची धडक तपासणी मोहिम  भेसळीची माहिती देण्याचे आवाहन 

0 1 2 1 1 2

जालना/प्रतिनिधी,दि. 6 

दिपावली सणानिमित्त दुग्ध व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती फार मोठ्या प्रमाणात केली जाते, त्यामुळे या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकारास आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत धडक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
दुध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये केल्या जाण्याऱ्या भेसळीमुळे जनतेच्या विशेषत: लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गुणवत्तापूर्ण दुधास योग्य दर मिळत नाही, पर्यायाने शेतकऱ्यांचे नुकसान होते व भेसळखोर स्वतःचा फायदा करुन घेतात. दुध व दुग्धजन्य पदार्थांच्या बाजारपेठेत होणारी भेसळ रोखण्यास जिल्हास्तरीय समिती मार्फत धडक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
दरम्यान, बाजारपेठेत दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीबाबत माहिती कळाल्यास नागरिकांनी तात्काळ याबाबतची माहिती अपर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, जालना येथे द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल,  असे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा  दूध व दुग्धजन्य पदार्थांत होणारी भेसळ रोखणाऱ्या जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षा रिता मेत्रेवार आणि जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी आर.बी. मते यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 2